Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ समोर येतात. काही व्हिडीओ पाहून पोट धरून हसायला येते तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही व्हिडीओ पाहून अंगावर काटा सुद्धा येतो. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून कोणाचाही थरकाप उडेल. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की दोन तरुण समुद्रात बुडालेल्या महिलेला किनाऱ्याजवळ आणताना दिसत आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकं काय घडलं, त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.
हरिहरेश्वर समुद्रात बुडून महिलेचा मृत्यू
therefore_ritzz या इन्स्टाग्राम अकाउंटवरून ऋतुजा नावाच्या तरुणीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने संपूर्ण घटनेविषयी माहिती दिली आहे. ही तरुणी सांगते, “२३ मार्च रविवारी सकाळी ९ वाजताची घटना :- हरिहरेश्वर बीच ला फिरायला आलेल्या महिलांच्या ग्रुपमधून एक महिला समुद्राच्या किनाऱ्यावरील खड़कावर फोटो काढण्यास गेली होती, या दरम्यान ती पाय घसरून समुद्रात पड़ली आणि विशालकाय आलेल्या लाटामुळे ती पाण्यात ओढली गेली. सुमारे १५ मिनीटे ती पाण्यातून बाहेर निघायचा प्रयत्न करत होती पण लाटांच्या प्रवाहामुळे ते शक्य झाले नाही. थोडयाच वेळात तेथील स्पोर्ट्स अॅक्टिविटीला कळविण्यात आले. दोन तरुणांनी तिला किनाऱ्यालगत आणले. परंतु तोवर ती तिचा जीव गमावून बसली होती.घटनास्थळी हा सर्व प्रकार स्वतःच्या डोळ्यासमोर बघून अंगाला शहारे फ़ुटले!!”
ही तरुणी पुढे सांगते, “व्हिडीओ शेअर करायच तात्पर्य हेच की हे सर्व एका फोटोच्या नादात झाले. निसर्गरम्य वातावरणात फोटो काढणे साहाजिकच !! पण त्याच निसर्गाने रौद्र रूप धारण केल्यास आपण आपला जीव गमावू शकतो.”
व्हायरल व्हिडीओ (Video Viral)
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत . एका युजरने लिहिलेय, “येथील समुद्र नेहमी खवळलेला असतो. लाटा कधी वाढतात काहीच समजत नाही” तर एका युजरने लिहिलेय, “खूप रौद्र समुद्र आहे हरिहरेश्वरचा. कसे काय लोक एवढे डेरिंग करतात काय माहीत” आणखी एका युजरने लिहिलेय, “निसर्गाच्या कुठल्याच गोष्टीबरोबर चेष्टा करायची नाही” एक युजर लिहितो, “तरी लोक सुधरत नाही या मोबाईल आणि सेल्फीच्या नादात आपला जीव गमावून बसतात” तर एक युजर लिहितो, “हरीहरेश्वर चा समुद्र बघूनच हिंमत नाही होत पाण्यात जायची..त्यात त्या प्रदक्षिणा मार्ग तर अत्यंत धोकादायक आहे.. आम्ही तर दूर राहून माघारी येतो.” अनेक युजर्सनी हरिहरेश्वर येथील समुद्र भयानक असल्याचे सांगितले आहे.