Gomti Nagar Harassment Case Video Viral : लखनऊच्या गोमती नगर भागात नुकतीच पावसाचे पाणी उडवून महिलेची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पावसाच्या साचलेल्या पाण्यातून बाईक किंवा कारमधून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांवर पाणी उडवून काही तरुणांच्या जमावाने त्रास दिल्याचे अनेक व्हिडिओ समोर आले आहे. दरम्यान आता या तरुणांना चोप देणाऱ्या पोलिसांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना प्रचंड धक्का बसला आहे. आपल्या देशातील तरुणाई कोणत्या दिशेने चालली आहे असा चिंता अनेकांना व्यक्त केली. अनेकांनी या घटनेचा निषेध करत आपला रोष व्यक्त केला.

जमावाने नागरिकांच्या अंगावर उडवले पाणी

या घटनेचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये काही तरुणांना ताज हॉटेल ब्रिजच्या खाली दुचाकी ओलांडताना दिसत असताना ते गुडघाभर पाण्यात पाण्यात ये-जा करणाऱ्यांना अडवून त्यांच्या अंगावर पाणी उडवतात. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी तातडीने कारवाई केली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन केलेल्या कारवाईचा व्हिडिओ चर्चेत आला आहे.

Offensive video viral of female police sub inspector Nagpur news
महिला पोलीस उपनिरीक्षकाचा आक्षेपार्ह ‘व्हिडिओ व्हायरल’
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Mumbai rape case
मुंबई: दहा वर्षांपूर्वी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला अटक
Diwali cleaning, home, theft, house, crime news, mumbai
मुंबई : दिवाळीनिमित्त घरात केलेली साफसफाई पडली महागात, कशी ते वाचा आणि सावध व्हा
female police officer nearly kisses womans lips video viral
ऑन ड्युटी महिला पोलिस अधिकाऱ्याने मर्यादा ओलांडली, मान धरली, किस केलं अन्…; लज्जास्पद Video व्हायरल
Badlapur Case, High Court, police duty,
बदलापूर प्रकरण : कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलिसांवर काय कारवाई केली ? उच्च न्यायालयाचा सवाल
kalyan de addiction centre staffers arrested for assaulting patients
दारू सोडविण्यासाठी आलेल्या रुग्णांना मारहाण; कल्याणमधील अनधिकृत नशामुक्ती केंद्राचा अमानुष कारभार
Police fired on sandalwood thieves
विधी महाविद्यालय रस्त्यावर चंदन चोरट्यांकडून पोलिसांवर हल्ला, पोलिसांकडून गोळीबार

हेही वाचा – Video: भयावह! भरदिवसा तरुणांच्या जमावाने काढली महिलेची छेड; अंगावर उडवले पाणी, दुचाकी ओढून पाण्यात पाडले

पोलिसांनी केली तरुणांवर कारवाई

पोलिस घटनास्थळी पोहचताच तरुणांनी तेथून पळ काढला. काही तरुणांना पकडून पोलिसांनी चांगला चोप दिला. दरम्यान या प्रकरणात मोहम्मद अरबाज आणि विराज साहू या इतर दोघांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर या गुरुवारी आणखी १२ जणांना अटक केली. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांची एकूण संख्या १६ झाली आहे. यापूर्वी पवन यादव आणि सुनील यादव यांना पोलिसांनी अटक केली होती

लखनऊच्या पोलिस उपायुक्त रवीना त्यागी यांनी सांगितले की, “घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गुन्हेगारांची ओळख पटवण्यासाठी फुटेजचे पाहण्यास सुरुवात केली. योग्य आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आणि आरोपींची ओळख पटवण्यासाठी तीन पोलिस पथके तयार करण्यात आली.”

हेही वाचा – वृद्धाचे संतापजनक कृत्य! दुकानात खरेदी करणाऱ्या महिलेबरोबर घडली धक्कादायक घटना, Video Viral

युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी राज्य कटिबद्ध असल्याचे सांगून या प्रकरणात जलद न्याय देण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे झाले आहे. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या निर्देशानुसार डीसीपी, एडीसीपी आणि एसीपी यांना हटवण्यात आले आहे, तर एसएचओ गोमतीनगर आणि पोलीस चौकी प्रभारी यांना निलंबित करण्यात आले आहे.