सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात, यातील काही आपलं मनोरंजन करणारे असतात, तर काही आपणाला आश्चर्यचकित करणारे असतात. खरं तर, सोशल मीडियामुळे आपल्याला अनेकदा असे व्हिडीओ पाहायला मिळतात ज्याचा आपण कधी विचारही केलेला नसतो. अनेकदा क्षुल्लक कारणावरुन झालेली भांडणे, तर कधी निष्काळजीपणामुळे झालेले अपघात व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही महिला एकमेकींना मारहाण करताना दिसत आहेत. महिलांच्या या भांडणाला कारणीभूत ठरली आहे ‘सेल्फी’; कदाचित हे वाचून तुम्ही आश्चर्यचकित होऊ शकता.

मिळालेल्या माहितीनुसार, महिलांच्या भांडणाचा हा व्हिडिओ आंध्र प्रदेशातील गुंटूर येथील असल्याचं सांगितलं जात आहे. येथील गांधी पार्कमध्ये काही महिलांमध्ये जोरदार हाणामारी झाली. तर ही हाणामारी सेल्फी घेण्याच्या कारणावरुन झाल्याचं सांगितलं जात आहे. इथे मोठ्या प्रमाणात महिला जमल्या होत्या. यावेळी काही महिला सेल्फी घेत असतानाच तिथे उपस्थित महिलेशी त्यांचा वाद झाला आणि वादाचे रुपांतर हाणामारीत झाले.

Causes of unwanted hair growth
Facial Hair : हनुवटी आणि गालावर भरपूर केस येतात? मग ‘ही’ असू शकतात कारणे; करू नका दुर्लक्ष
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
या महिला कधी सुधारणार? फक्त हात लागला म्हणून जोरदार बाचाबाची; इंग्रजीत सुरु झालेलं भांडण हिंदीवर गेलं, VIDEO पाहून पोट धरुन हसाल
video of marathi ukhane
Video : “…राव आहे अजय देवगण तर मी आहे रविना टंडन” विदर्भातील महिलांनी घेतले भन्नाट उखाणे
थेट विरार लोकलवर चढली महिला! कारण वाचून व्हाल अवाक्, पाहा VIDEO
Mumbai local kelvan video what is kelvan why kelvan is done before maharashtrian wedding kelvan ideas
मुंबईकर महिलांचा नाद नाय! ट्रेनमध्ये थाटात केलं केळवण; धावती ट्रेन पंचपक्वान्न अन् आनंद; प्रत्येकानं पाहावा असा VIDEO
Little Boy Dressed up as dada Kondke
घाबरलेल्या, वैतागलेल्या चिमुकल्या दादा कोंडकेचा VIDEO मनाला भिडला; हावभाव नाही तर डान्स स्टेप्स पाहून नेटकरी फिदा
viral video unhealthy vegetables flower selling in market with chemical shocking video goes viral on social media
आता तर हद्दच पार केली! महिलांनो ‘हा’ VIDEO पाहिला तर यापुढे भाजी घेताना शंभर वेळा विचार कराल

हेही वाचा- याला म्हणतात नशीब! कारकुनाच्या ‘त्या’ चुकीमुळे पालटलं नशीब; वृद्ध व्यक्ती रातोरात बनला करोडपती

व्हिडिओमध्ये दोन गटात हाणामारी सुरु असल्याचं दिसत आहे. यावेळी तीन ते चार महिला एकीला वाईटरित्या मारताना दिसत आहेत. शिवाय समोरच्या गटातील महिला स्वत:च्या बचावासाठी लाथा मारत असल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये महिला एकमेकींचे केस ओढतानाही दिसत आहेत. महिलांची भांडण सुरु असताना तिथे शेकडो लोक उपस्थित असलयाचंही दिसत आहे.

महिलांच्या या भांडनाचा व्हिडीओ @gharkekalesh नावाच्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवरुन शेअर केल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतअसून तो आतापर्यंत ९३ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर अनेकजण त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिलं, “लोक या भांडणाची मजा घेत आहेत.” तर आणखी एकाने लिहिलं, “गांधी’ पार्कमध्ये ‘हिंसा.”

Story img Loader