आपल्याला माहितीये शहराकडे गावाकडची जुनी, वयस्कर लोकं आली की त्यांना बावरल्यासारखं होत. आजूबाजूचं शहर त्यांच्यासाठी नवीन असल्यामुळे ते पुरते गोंधळलेले असतात. सोबत कुणी शहरातलं असेल तर ठिक नाहीतर कितीतरी लोक हरवतात सुद्धा. शहरात वावरताना प्रत्येक गोष्ट त्यांच्यासाठी नवी असते. अगदी बाजारपेठांपासून, मॉल, रेल्वे स्टेशन सगळ सगळ. अशाच दोन आज्जीबाईंचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. शहरात पहिल्यांदाच आल्यावर त्यांच्यासोबत नक्की काय घडलं तुम्हीच पाहा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एस्केलेटर किंवा सरकते जिने तुम्ही स्टेशन, मॉल, मेट्रो, विमानतळाजवळ पाहिले असणार. अनेकांनी याचा वापर देखील केला असणार. या जिन्यांमुळे लोकांना पायऱ्या चढायचा त्रास वाचतो आणि काही सामान असेल तरी तुम्ही त्याला नीट विना मेहनत घेऊन प्रवास करु शकता. पण यासंबंधी एक असा व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्ही तुमच्या घरातील वृद्ध व्यक्तींना एस्केलेटर एकटं जाण्यास नक्की रोखाल.

आजीबाई पहिल्यांदाच एस्केलेटरवर जातात तेव्हा…

एस्केलेटरवर चढणे बर्‍याच लोकांसाठी खूप कठीण आहे. जे लोक दररोज एस्केलेटर वापरतात, त्यांच्यासाठी चढणे ही मोठी गोष्ट नाही. पण जे लोक एस्केलेटरवर पहिल्यांदाच चढत आहेत त्यांच्यासाठी ते हाताळणे खूप कठीण आहे. एस्केलेटरवर नर्व्हस होताना किंवा इतरांच्या मदतीने चढताना तुम्ही अनेकांना पाहिले असेल. मात्र अनेकवेळा काही लोक पहिल्यांदाच एस्केलेटरवर वापरत असताना अपघाताला बळी पडतात.

लोक फक्त पाहत राहिले

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, साडी नेसलेल्या दोन महिला एस्केलेटरवर चढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. प्रथम एक महिला एस्केलेटरवर चढते. तर तिच्या मागे दुसरी महिला चढत आहे. मागे उभी असलेली बाई समोरच्या महिलेच्या साडीचा पदर पकडते. त्यामुळे तिला पुढे जाता येत नाही. व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे दिसेल की पदर धरल्यामुळे समोर उभी असलेली महिला मागच्या महिलेवर पडते. आणि दोन्ही महिला एस्केलेटरवरुन उलट्या मागे पडतात. विशेष म्हणजे जवळच दोन माणसे उभी आहेत, जी त्यांना पाहत आहेत. मात्र, यापैकी कोणीही महिलांच्या मदतीसाठी पुढे येत नाही. ते नुसते बघत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> लाल साडीतील तरुणीचा डान्स पाहून…गौतमी पाटीललादेखील विसरून जाल; VIDEO तुफान व्हायरल

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेक यूजर्सनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने म्हटले की, ‘तिला खूप वाईट वाटले असेल, ती वृद्ध आई आहे.’ तर दुसऱ्या युजरने व्हिडीओ मेकरला फटकारले आणि म्हटले, ‘तू व्हिडिओ का बनवत होतास? तुम्ही आधी मदत करायला हवी होती.