WWE superstar john Cena sings Srk’s song : अनेकांनी बालपणी किंवा शाळेत असताना WWE हा कार्यक्रम हमखास पाहिला असेल. त्या काळात या कार्यक्रमाची तुफान क्रेझ होती. तशी ती आतादेखील आहे. मात्र, काही वर्षांपूर्वी wwe म्हणजे ट्रिपल एच, केन, अंडरटेकर व जॉन सीना यांसारख्या सुपरस्टारच्या नावांनीच हा कार्यक्रम ओळखला जायचा. मात्र, सध्या याच wwe सुपरस्टार जॉन सीनाचा एक भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचे कारण त्याने एखादी मॅच वगैरे नसून एक गाणे गायले आहे.
इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @teamshahrukhkhan या अकाउंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला गेला आहे. त्यामध्ये जॉन सीना चक्क बॉलीवूड सिनेमामधील एक हिंदी गाणे गाण्याच प्रयत्न करीत आहे, असे आपल्याला दिसते. तो कोणते गाणे गात आहे ते पाहू. व्हिडीओमध्ये गुरव सिहरा [gurvsihra] हा भारतीय रेसलर जॉन सीनाला बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचे ‘भोली सी सुरत’ हे गाणे गायला शिकवत आहे. त्याप्रमाणे गुरवच्या मागोमाग जॉन सीनाने या गाण्याच्या चार ओळी गायल्या आहेत.
त्यामध्ये जॉन सीनाने अगदी स्पष्ट आणि न अडखळता हे गाणे म्हटले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होताच शाहरुख खान आणि जॉन सीना या दोघांच्याही चाहत्यांनी हा व्हिडीओ चांगलाच डोक्यावर घेतला आहे. त्यांच्या काही प्रतिक्रिया पाहू.
“जर जॉन सीना आणि शाहरुख खानने सिनेमात एकत्र काम केले तर,” असे एकाने लिहिले आहे. दुसऱ्याने, “जॉन सीना हिंदी गाणे किती सुंदर गात आहे,” असे म्हटले आहे. जॉन सीनाच्या प्रसिद्ध ‘you can’t see me’ या वाक्यावरून तिसऱ्याने, “खूपच विचित्र व्हिडीओ आहे.. कुणीतरी व्हिडीओमध्ये काहीतरी बोलत असल्याचा आवाज येत आहे; मात्र दिसत कुणीच नाहीये…” अशी मिश्कील प्रतिक्रिया लिहिली आहे. चौथ्याने, “वाह! एकदम भन्नाट व्हिडीओ”, असे लिहिले आहे.
जॉन सीना, भोली सी सुरत गाणे गातानाचा व्हिडीओ :
WWE ही एक अमेरिकन रेसलिंग कंपनी आहे. व्हायरल होणारा हा व्हिडीओ मूलतः गुरव सिहरा [@gurvsihra] या भारतीय रेसलरने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला. नंतर @teamshahrukhkhan या अकाउंटने तो पुन्हा त्यांच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ३१.८K इतके व्ह्युज मिळाले आहेत.