आजच्या काळात सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंचं प्रमाण वाढत चाललंय. अगदी लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेक जण सोशल मीडियाच्या आहारी गेले आहेत. सोशल मीडियावर आपली कला सिद्ध करून अनेक इन्फ्लूएंसर यशाच्या शिखरावर पोहोचले आहेत. परंतु, काही जण याचा वापर अगदी थिल्लरपणा करण्यासाठी करतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनेकदा सोशल मीडियावर वेगवेगळ्या स्टंटचे व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहतो. लोक कधी सार्वजनिक ठिकाणी तर कधी रस्त्यांवर जीवघेणे स्टंट करत असतात. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी आणि काही व्ह्युज आणि लाइक्ससाठी ते स्वत:सह इतरांचा जीवही धोक्यात टाकायला मागे-पुढे पाहत नाहीत. सध्या अशाच एका इन्फ्लूएन्सरने प्रसिद्धी मिळविण्यासाठी भररस्त्यात जीवघेणे कृत्य केले आहे. त्यासंबंधीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

हेही वाचा… आयुष्याचा खेळ करू नका! सुतळी बॉम्ब पेटवला अन् मित्राच्या तोंडात टाकला, पुढे काय घडलं? पाहा VIDEO

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत एक तरुणी चक्क लहान बाळाला घेऊन स्टंट करताना दिसतेय. रस्त्याच्या कडेवरील संरक्षक भिंतीवर उभी राहून ही तरुणी स्टंट करताना दिसतेय. स्वत:बरोबर त्या चिमुकल्याचाही जीव धोक्यात घालत आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या या उंच संरक्षक भिंतीवर उभी राहून आपल्या पोटाशी बाळाला बांधून ही तरुणी तिथून उडी मारताना दिसतेय.

हा व्हायरल व्हिडीओ @shalugymnast या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून ‘बाळाबरोबर केला स्टंट’ असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. या व्हिडीओला तब्बल १४.५ मिलियन व्ह्यूज आले आहेत. यादरम्यान ही घटना नेमकी कुठे घडलीय हे अद्याप कळलेलं नाही.

हेही वाचा… “फेविकॉल से…”, भारतीय विद्यार्थीनीने ऑस्ट्रेलियात केला धमाकेदार डान्स, VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “स्वत: मरशील, त्या पोरालाही मारशील”; तर दुसऱ्याने “काही लाईक्स आणि कमेंट्ससाठी मुलाच्या आयुष्याबरोबर खेळू नका”, अशी कमेंट केली. तर तिसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “कृपया हिची तक्रार करा, बाळासोबत अशी गोष्ट करतेय म्हणजे तिला खरोखर वेड लागले आहे, यामुळे एकतर अपघात किंवा हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.”

हेही वाचा… रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; वर्गात बेंचवर चढली अन् तरुणीबरोबर असं काही झालं की…, पाहा VIDEO

दरम्यान, याआधीही अनेकदा रील्ससाठी लोक भररस्त्यात आपला जीव धोक्यात घालून स्टंट करताना दिसले आहेत. यामुळे अनेकदा त्यांना स्वत:चा जीव गमवावा लागला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video of young girl doing stunt with little kid went viral on social media dvr