Viral Video: नव्याने बनलेल्या नात्यात सुरुवातीला खुप पझेसिव्हनेस असतो. खरं सांगायचं तर मुलांपेक्षा जास्त मुलींचा हा स्वभाव असतो. पण ,म्हणतात, जसं वयासह नातंही वाढत जातं तसं त्यातील प्रेम व विश्वास मुरत जातो. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच प्रेम व हाच विश्वास पाहायला मिळेल. एक वयस्कर जोडप्याचा मेट्रोमधून प्रवास करतानाच व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. यामध्ये एक म्युजिक बँड भर मेट्रोतच म्युजिक वाजवताना आजोबांना नाचायचा मोह आवरत नाही. पण आजोबा नाचायला जागेवरून उठताच त्यांची बायको असं काही करते की तुम्हाला गल्ली बॉय मधील आलियाचा, “मेरे बॉयफ्रेंड से गुलुगुलु करेगी तो” हा डायलॉगच आठवेल.

आपण पाहू शकता की, जसे आजोबा नाचायला उठतात तशा या आजी आपल्या अहोंचं टीशर्ट पकडून मागे खेचतात. पण आजोबांना काही केल्या नाचायचं असतंच मग थेट आपल्या बिग बॉसशी पंगा घेऊन ते नाचायला उठतात. बरं इतक्यावरच थांबत नाहीत तर समोर बसलेल्या एका तरुणीला ते आपल्यासह डान्स करण्यासाठी नम्रपणे विचारतात. ती तरुणी जशी उठून आजोबांसह नाचू लागते तसे आजींच्या चेहऱ्यावरचा हावभाव बघून तुम्हीही लोटपोट व्हाल.

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Groom dance for bride on hoshil ka ya pathyachi sobar gharwali marathi song video goes viral on social media
VIDEO: “बायको पाहिजे नखरेवाली” मराठमोळ्या गाण्यावर नवरदेवाचा भन्नाट डान्स; काय ते प्रेम, काय तो डान्स…आहाहा!
two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष

बिग बॉस नाही म्हणूनही नाचू लागले आजोबा

हे ही वाचा<< Video: ‘ती’ थरथरत होती पण ‘तो’ इतका गर्विष्ठ की..विमानात प्रवासी व हवाई सुंदरीमध्ये खडाजंगी; म्हणाला, “तू नोकर..”

दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून अनेकांनी यावर लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. प्रेम असावं तर असं असे म्हणत अनेकांनी या जोडप्याच्या हसऱ्या स्वभावचं कौतुक केलं आहे. तर काहींनी मात्र आजी नाही म्हणूनही आजोबांनी नाचायची जी हिमंत दाखवली त्याची दाद दिली आहे.

Story img Loader