Viral Video: रमीज राजा यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) चे अध्यक्षपद स्वीकारल्यापासूनमी अनेकदा चर्चेत आले आहेत. रविवारी दुबईत पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील आशिया चषक अंतिम सामन्यांनंतर रमीज राजा यांनी केलेल्या एका कृती सोशल मीडियावर अनेक क्रिकेटप्रेमींकडून विरोध केला जात आहे. सामन्यांनंतर पाकिस्तानचा पराभव झाल्याबद्दल एका पत्रकाराने केलेल्या सवालावर भडकून रमीज राजा यांनी चक्क त्याचा फोन हातातून खेचून घेतल्याचे समजत आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून रमीज राजा यांची वागणूक उद्धट असल्याची प्रतिक्रिया समोर येत आहेत.
Video: ए भाई जरा.. पाकिस्तानच्या पराभवानंतर दिल्ली पोलिसांची मजेशीर टीका; व्हिडीओ झाला Viral
नेमकं काय झालं?
श्रीलंकेकडून पाकिस्तानचा २३ धावांनी पराभव झाल्यानंतर रमीज राजा दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममधून बाहेर पडत होते तेव्हा काही पत्रकार आणि चाहत्यांनी सामन्यावर त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांच्याभोवती गर्दी केली. यातील रोहित जुगलान नामक एका भारतीय पत्रकाराने अंतिम सामन्यातील पराभवानंतर निराश झालेल्या पाकिस्तानी लोकांना आपण काय सांगाल? असा साधा प्रश्न विचारला पण यात त्याने लोकांना उद्देशून आवाम (सामान्य लोक) असा शब्द वापरल्याने रमीज राजा यांचा पारा वाढला. आणि त्यांनी पत्रकाराला ‘आवाम’ (सामान्य लोक) शब्द वापरल्याबद्दल प्रतिवाद करण्यास सुरुवात केली. पत्रकाराने पीसीबी प्रमुखांना समजावण्याचा प्रयत्न केला असता वाद वाढतच गेला आणि रेकॉर्डिंग थांबवण्यासाठी रमीज यांनी चक्क पत्रकाराचा फोन खेचून घेतला.
रोहित जुगलान यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करून रमीज यांचे वर्तन गैर असल्याची तक्रार केली आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की रमीज यांना पाकिस्तानी चाहते नाखूष असतील असे म्हणताच पत्रकावर पलटवार करत, “तुम्ही तर भारताचे आहेत तुमचे लोक तर आता खूपच खुश असतील” असे म्हंटले आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ
याशिवाय रमीज एका चाहत्यावर चिडलेले सुद्धा दिसून आले. चुकून खांद्यावर हात ठेवल्याने चाहत्याला रमीज यांनी तुमचा हात काढा आणि कॅमेरापासून दूर राहा अशा शब्दात सुनावले होते. पाकिस्तानचा श्रीलंकेसमोर झालेल्या पराभव पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांना फारच जिव्हारी लागला असल्याचे या दोन्ही प्रसंगातून दिसून येत आहे.
दरम्यान, श्रीलंकेने पाकिस्तानचा २३ धावांनी पराभव करून सहाव्यांदा आशिया चषक आपल्या नावे करून घेतला आहे. दुबईत १७१ धावांचा पाठलाग करताना वेगवान गोलंदाज प्रमोद मदुशन (४-३४) आणि वानिंदू हसरंगा (३-२७) यांनी सात विकेट्सची भागीदारी करत पाकिस्तानला १४७ धावांत गुंडाळले. राजकीय अशांततेमुळे स्पर्धेचे यजमानपद सोडावे लागलेल्या श्रीलंकेने, या महत्त्वाच्या विजयामुळे आपल्या देशवासियांना चार सुखाचे क्षण दिले आहेत.