India vs Pakistan: भारत व पाकिस्तानी हे दोन देश एकमेकांचे जन्मोजन्मीचे शत्रू असल्यासारखे ओळखले जातात. अगदी क्रिकेटच्या मैदानापासून ते जागतिक व्यासपीठावर सुद्धा या शेजाऱ्यांचे शत्रुत्व दिसून येते. भारत- पाक वादाचा केंद्रबिंदू ठरलेला मुद्दा म्हणजे काश्मीर! आजवर आपण काश्मीर मागणीवरून झालेले अनेक वाद पाहिले असतील पण आता व्हायरल होणारा वाद हा इतका मजेशीर आहे की तो बघून हसावं की विचार करत बसावं हेच आपल्याला कळणार नाही. नेमकं काय आहे या व्हिडिओत चला पाहुयात..

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, भारत व पाकिस्तानमध्ये काश्मीर मुद्दा सोडवला गेला तर वादाला काही कारणच उरणार नाही असे म्हणत ही चर्चा सुरु झाली आहे. अँकर फखर युसूफ़जाई यांनी काश्मीर मुद्द्यावरून पुन्हा भारताला लक्ष्य करत, भारतच कसा चर्चेत राहण्यासाठी वाद मिटवण्यास तयार नाही हे दाखवण्याचा प्रयत्न केला, ज्यावर चर्चेतील अन्य सहभागी याना मीर हिने, उलट भारताची बाजू घेत काश्मीरचा काही मुद्दाच नाही, पाकिस्तान मुद्दाम हा विषय वाढवतोय असा पलटवार केला. पुढे ही चर्चा पेटली असताना याच यानाने दिलेलं एक उत्तर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Dr. Manmohan Singh passes away at 92
Manmohan Singh : केंब्रिजमध्ये शिक्षण, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ते देशाचे पंतप्रधान! अशी होती मनमोहन सिंग यांची कारकीर्द
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
money laundering in immigration
ED On Canada Colleges : कॅनडातील २६० महाविद्यालयांचा मानवी तस्करीशी संबंध; ‘ईडी’कडून धक्कादायक माहिती उघड
Bangladesh husband and wife, Pimpri-Chinchwad,
पिंपरी-चिंचवडमधून बांगलादेशी पती-पत्नीला अटक; एटीबीची कारवाई, आठ दिवसांपासून हॉटेलमध्ये…

फखर यांनी भारत व पाकिस्तानमधील काश्मीर मुद्दा हा एकमेव भांडणाचा विषय आहे का असा प्रश्न घेऊन पुन्हा यानाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. जगात एवढ्या समस्या आहेत ज्यांची उत्तरे शोधण्यासाठी प्रयत्न होत आहे पण मग आपण काश्मीरचा मुद्दा बसून, बोलून का सोडवू शकत नाही का असेही फखर यांनी विचारले. यावेळी याना मीर हिने अत्यंत सोप्या शब्दात न्यूज अँकरला चांगलीच समज दिली.

हे ही वाचा<< Video: ‘ती’ थरथरत होती पण ‘तो’ इतका गर्विष्ठ की..विमानात प्रवासी व हवाई सुंदरीमध्ये खडाजंगी; म्हणाला, “तू नोकर..”

काश्मीर ही भारताची पत्नी…

याना म्हणाली की समजा तुम्ही एका मुलीवर प्रेम करताय, पण तिचं लग्न झालं आहे. आता तुम्ही जागतिक व्यासपीठावर जाऊन सर्वांना सांगता की माझं तिच्यावर प्रेम आहे आणि ती तिच्या नवऱ्यासह खुश नाही. पण मुळात तुमचं जिच्यावर प्रेम आहे तीच तुमच्या बाजूने उभी राहत नाही. ती सांगते की नाही मी तर माझ्या नवऱ्याबरोबर खुश आहे. अशावेळी तुम्ही बाजूला व्हायला हवं की तिच्या नवऱ्याने हे साधं गणित आहे. यानाचे हे उत्तर ऐकून चर्चेत सहभागी पॅनलमध्ये एकच हशा पिकला होता. हा व्हिडीओ जुना जरी असला तरी मागील काही दिवसांपासून प्रचंड व्हायरल होत आहे.

Story img Loader