अंकिता देशकर
Karachi Nuclear Power Project Explosion Fact Check: लाईटहाऊस जर्नालिज्मला मोठ्या प्रमाणात एक ट्वीट व्हायरल होत असल्याचे लक्षात आले. ट्वीट मध्ये म्हटले होते की, “कराची मध्ये असलेल्या अणुऊर्जा प्रकल्प म्हणजेच न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये भीषण स्फोट झाला आहे.”. जॉन हॉपकिन युनिव्हर्सिटीमधील एक प्रोफेसर, स्टीव्ह हांक यांनी व्हायरल व्हिडिओ आपल्या ट्विटर प्रोफाइल वर शेअर केला आहे.
काय होत आहे व्हायरल?
बाकी यूजर्स देखील हाच दावा शेअर करत आहेत.
तपास:
आम्ही आमच्या तपासाची सुरुवात व्हायरल दाव्याबद्दल किवर्ड सर्च करून केली. या किवर्डस द्वारे आम्हाला Dawn ची एक बातमी सापडली.
बातमीचे शीर्षक होते: ग्रिड स्टेशनला आग लागल्याने डीएचए रहिवाशांना अनेक तास विना वीज राहावे लागले. सदर बातमी १२ जून, २०२३ रोजी प्रकाशित झाली होती आणि यात घटनेचे फोटो देखील होते. खयाबान-ए-इत्तिहाद येथील के-इलेक्ट्रिक ग्रिड स्टेशनला आग लागल्यानंतर संरक्षण गृहनिर्माण प्राधिकरणाच्या भागात वीज खंडित झाल्याचेही अहवालात म्हटले आहे.
आम्ही Pakistan Atomic Energy Commission ची वेबसाईट देखील तपासली.
वेबसाइटमध्ये म्हटले आहे की कराची अणुऊर्जा प्रकल्प (KANUPP) युनिट 1 हा पाकिस्तानचा पहिला अणुऊर्जा प्रकल्प आहे आणि तो कराचीच्या बाहेरील भागात बांधला गेला आहे.
आम्ही Dawn News चे वार्ताहर सागर सूहिन्द्रो यांना संपर्क केला. त्यांनी आम्हाला माहिती दिली, “हा अणुऊर्जा प्रकल्प नसून एक सामान्य ग्रिड स्टेशन आहे, ज्याला दोन दिवसांपूर्वी आग लागली होती. हे ग्रिड स्टेशन कराचीतील वीज पुरवठा करणार्या ‘के इलेक्ट्रिक कंपनी’ चे होते. या घटनेमुळे वीज पुरवठा बंद होता.
कराची शहरापासून सुमारे १८ ते २० किलोमीटर अंतरावर दुर्गम भागात अणुऊर्जा प्रकल्पाची तीन युनिट्स बांधण्यात आली आहेत, असेही त्यांनी आम्हाला सांगितले. आम्ही व्हिडिओच्या स्क्रीन ग्रॅबवर गूगल रिव्हर्स इमेज शोध देखील केला. आम्हाला आढळले की हा व्हिडिओ पाकिस्तानमधील डिजिटल मीडिया प्रकाशन टाइम्स ऑफ कराचीने अपलोड केला होता.
ट्विटमध्ये म्हटले होते: आज सकाळी कराचीतील खयाबान शाहीन डिफेन्स फेज 6 भागातील इलेक्ट्रिक ग्रिड स्टेशनला आग लागली. के इलेक्ट्रिकच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित ग्रिड स्टेशनवरील दुरुस्तीचे काम वेगाने सुरू आहे. ग्रिड स्टेशनवर तात्पुरता शटडाऊन घेण्यात आला असून, तो लवकरच पूर्ववत केला जाईल. प्रभावित ग्रिड स्टेशनशी जोडलेले काही भाग पुनर्संचयित करण्यात आले आहेत. दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यासाठी ३ ते ४ तास लागतात. कामे वेळेत पूर्ण होतील.
निष्कर्ष: कराची मधील अणुऊर्जा प्रकल्पात शक्तिशाली स्फोट झाला नाही. एका सामान्य ग्रिड स्टेशनला आग लागली होती, व्हायरल दावा खोटा आहे.