Panvel Demolition Video: लाइटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर केलेला व्हिडिओ आढळला ज्यामध्ये बुलडोझरने काही दुकाने उद्ध्वस्त केली जात असल्याचे दिसले. यूपीमधील पराभवानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गरिबांचे व्यवसाय उद्ध्वस्त करत असल्याचा दावा व्हिडीओसह करण्यात आला होता. तपासादरम्यान आम्हाला आढळून आले की हा व्हिडिओ उत्तर प्रदेशचा नसून महाराष्ट्रातील आहे. नेमकं हे प्रकरण महाराष्ट्रात कुठे घडल हे पाहूया..

काय होत आहे व्हायरल?

X युजर PRBAZUKA ने व्हायरल व्हिडिओ व्हायरल दाव्यासह आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.

pune video
“चला गोल फिरा..” ही पुणेरी पाटी कशासाठी? Video होतोय व्हायरल
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Mumbai Local Birthday Celebration
‘बार बार दिन ये आए…’ दणक्यात साजरा केला रेल्वे ग्रुपमधील सदस्याचा वाढदिवस; पाहा मुंबई लोकलचा खास Viral Video
Raigad Hindi speaking Bhajiwali Controversy shocking video goes viral after kalyan case
“मैं मराठी नही बोलूंगी…तुम हिंदी बोलो” यूपीच्या भाजीवालीची रायगडमध्ये अरेरावी; VIDEO पाहून तुम्हालाही येईल संताप
Locals Saved Me Foreigner Argues With Delhi Rickshaw Puller Over Fare
Video : ‘या लोकांमुळे भारतीयांचे नाव खराब होते’, पर्यटकाला लुटण्याचा रिक्षाचालकाचा प्रयत्न; ‘१५०० रुपये दे’ म्हणत परदेशी व्यक्तीच्या मागेच लागला शेवटी…
Crime News
Crime News : क्रौर्याचा कळस! सुनेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये सासऱ्यांनी मिरची पावडर टाकली, सासूने दिले रॉडचे चटके; कुठे घडली घटना?
Kangana Ranaut rahul gandhi
Kangana Ranaut : “संसदेत जिम ट्रेनरप्रमाणे बायसेप्स दाखवत…”, कंगना रणौत यांचे राहुल गांधींवर गंभीर आरोप
PM Narendra Modi
PM Narendra Modi : जखमी खासदारांची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून विचारपूस, नेमकं काय घडलं संसदेत?

इतर वापरकर्ते देखील हाच व्हिडिओ शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही व्हिडिओ डाउनलोड करून आणि InVid टूलमध्ये अपलोड करून आणि व्हिडिओमधून अनेक कीफ्रेम मिळवून आमची तपासणी सुरू केली.या कीफ्रेम्सच्या माध्यमातून आम्हाला बुलडोझरवरील नंबर प्लेट ‘MH05FB8336’ असल्याचे आढळून आले, ज्यामुळे व्हिडिओ महाराष्ट्रातील असू शकतो हे स्पष्ट झाले. परिवहन वेबसाइटद्वारे आम्ही नंबर प्लेटचे नोंदणी तपशील तपासले आणि आम्हाला आढळले की वाहनाची नोंदणी कल्याण, महाराष्ट्र येथे झाली आहे. आम्ही इतर वेबसाइट्सवरील वाहनाचे तपशील देखील तपासले आणि ते वाहन ‘विक्रम देवीचंद चव्हाण’ या नावाने नोंदणीकृत असल्याचे आढळले.

https://www.cars24.com/rto-details?token=796663eee54f96ee28080b4dfc118403c081c6c040

त्यानंतर आम्ही बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) पीआरओशी संपर्क साधला, त्यांनी आम्हाला कळवले की कल्याण बीएमसीच्या अधिकारक्षेत्रात येत नाही. मुंबई महानगर प्रदेश (MMR) मध्ये ९ महानगरपालिका उदा. बृहन्मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी- निजामपूर, वसई-विरार, मीरा-भाईंदर आणि पनवेल यांचा समावेश होतो.

या शब्दांसमोर demolition शब्द वापरून आम्ही या महापालिकांना X वर कीवर्ड म्हणून तपासले. आम्हाला वेगळ्या अँगलचा एक समान व्हिडिओ सापडला ज्यामध्ये पनवेल महानगरपालिका शब्द वापरला गेला होता.

व्हायरल व्हिडिओमध्ये फळ विक्रेते दाखवण्यात आले होते आणि वरील X हँडलवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये फळ विक्रेतेही दाखवले होते. आम्ही पोस्टर्स चिकटवलेले लाल रंगाचे विद्युत वितरण पॅनेल देखील पाहिले, जे X वापरकर्त्याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सुद्धा दिसले होते. आम्ही मुंबईस्थित पत्रकार दीपक पळसुले यांच्याशी संपर्क साधला ज्यांनी पनवेल महानगरपालिकेच्या अंतर्गत केलेल्या कारवाईच्या व्हिडिओची पुष्टी केली.
खारघरचा रहिवासी असलेल्या सलीमच्या एक्स पोस्टचा समावेश असलेली बातमीही आम्हाला मिळाली.

https://www.newsband.in/article_detail/kharghar-residents-express-frustration-over-footpath-encroachment#

गुगल कीवर्ड सर्चद्वारे आम्हाला न्यूज बँडच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केलेला व्हायरल व्हिडिओ सापडला.

कॅप्शनमध्ये म्हटले आहे (भाषांतर): पनवेल महानगरपालिका (पीएमसी) गणेश मंदिर रोडवरील सेक्टर ३५ डी खारघरमध्ये फेरीवाल्यांविरुद्ध अतिक्रमणविरोधी मोहीम राबिवण्यात आली. १५ डिसेंबर २०२३ रोजी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. २००५ मध्ये सुरू झालेले, न्यूजबँड हे दैनिक स्थानिक इंग्रजी वृत्तपत्र आहे जे नवी मुंबई, ठाणे, पनवेल, उरण, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर येथे प्रकाशित होते.

हे ही वाचा<< “हिंदुजांनी नोकरांपेक्षा कुत्र्यावर जास्त खर्च केला”, घरकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आरोप; म्हणाले, “१८ तास काम करून फक्त..”

निष्कर्ष: पनवेल मधील अतिक्रमणविरोधी मोहिमेचा जुना व्हिडिओ उत्तर प्रदेशातील व नवीन असल्याचे सांगून व्हायरल केला जात आहे पण हा व्हिडीओ व दावा खोटा आहे.

Story img Loader