Viral Video : लहान मुले कधी काय करतील, काही सांगता येत नाही. त्यांच्याकडे नेहमी लक्ष द्यावे लागते. सोशल मीडियावर अशा अनेक घटनांचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत ज्यामध्ये पालकांच्या निष्काळजीपणामुळे किंवा त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे लहान मुलांचा जीव धोक्यात आला आहे.
सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकला नकळत लिफ्टमध्ये अडकतो. नेमकं काय घडते, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
हा व्हायरल व्हिडीओ एक लिफ्टमधील सीसीटिव्ही फुटेजचा आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की लिफ्ट उघडते तेव्हा लिफ्ट बाहेर तीन लहान मुले आणि एक महिला दिसते. या लहान मुलांपैकी एक चिमुकला नकळत त्या लिफ्टच्या आत शिरतो. इतर लहान मुलांचे आणि त्या महिलेचे लक्ष नसते आणि लिफ्ट बंद होते. त्यानंतर चिमुकला लिफ्टमध्ये असलेली बटण दाबतो. पण दरवाजा उघडत नाही त्यामुळे तो पुन्हा रडायला लागतो. लिफ्ट खाली येते. दरवाजा उघडतो पण तो बाहेर डोकावून पाहताच दरवाजा पुन्हा बंद होतो आणि पुन्हा लिफ्ट वरच्या दिशेने जाते. चिमुकल्याला काहीही सुचत नाही आणि तो ओरडायला सुरूवात करतो. त्यानंतर हा व्हिडीओ इथेच संपतो. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. या व्हिडीओवर लिहिलेय, “आपली मुलं नकळत अशा चुका करू शकतात काळजी घ्या.” सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ
sangram_dhanve या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “हे लक्षात ठेवा” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “निष्काळजीपणाचा कळस” तर एका युजरने लिहिलेय, “कृपया लहान मुलांची काळजी घ्या” आणखी एका युजरने लिहिलेय, “आईचे लक्ष असायला हवे” काही युजर्सनी पुढे काय घडले, याविषयी विचारले आहेत तर काही युजर्सनी या लहान मुलाविषयी काळजी व्यक्त केली आहे. अनेक युजर्सनी लहान मुलांकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला दिला आहे.