Passengers Pushing Train Viral Video: लाईटहाऊस जर्नालिज्मला एक व्हिडीओ सोशल मीडिया वर शेअर होत असलेला आढळला ज्यामध्ये प्रवाशांनी स्टेशनवर ट्रेन ढकलल्याचा दावा करण्यात आला आहे. बिघडलेली रेल्वे पुन्हा सुरु करण्यासाठी प्रवाशांनी रेल्वेला धक्का दिल्याचे या व्हिडीओसह व्हायरल होणाऱ्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. आम्हाला या व्हिडीओचा तपास केल्यावर काही महत्त्वाचे तपशील आमच्यासमोर आले आहेत.
काय होत आहे व्हायरल?
X यूजर Atul Singh Shanu ने व्हायरल व्हिडीओ आपल्या प्रोफाइलवर शेअर केला.
इतर वापरकर्ते देखील असाच दावा करत पोस्ट शेअर करत आहेत.
तपास:
आम्ही व्हिडीओवरून मिळवलेल्या कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च चालवून तपास सुरू केला. ‘Wirally’ या इंस्टाग्राम पेजवर रीलच्या स्वरूपात पोस्ट केलेला व्हायरल व्हिडीओ आम्हाला आढळला. रीलवरील मजकुरात ‘बिहारमध्ये आगीची घटना टाळण्यासाठी प्रवासी ट्रेनला जळत्या बोगीपासून वेगळे करण्यासाठी धक्का देतात’ असा उल्लेख आहे.
आम्हाला Republic World च्या वेबसाईटवर देखील हि बातमी आढळली.
अहवालात नमूद केले आहे: सोशल मीडियावर एक व्हायरल व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये प्रवासी रेल्वे ट्रॅकवर ट्रेन कशी ढकलत आहेत हे दिसत आहे. हा व्हायरल व्हिडीओ बिहारच्या किउल रेल्वे स्थानकाचा असल्याचे सांगितले जात आहे जिथे प्रवाशांनी आग लागलेल्या रेल्वे डब्यापासून संपूर्ण ट्रेन दूर ढकलली.
आम्हाला CNBC Awaaz ने पोस्ट केलेली रील देखील सापडली.
आम्हाला टाईम्स नाऊ वेबसाइटवर एक बातमी देखील आढळली. बातमी ६ जून रोजी अपलोड केली होती.
बातमीत नमूद केले आहे: एकीचे बळ दाखवणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. बिहारच्या लखीसराय जिल्ह्यातील किउल जंक्शन येथे गुरूवार,६ जून रोजी पाटणा-झारखंड पॅसेंजर ट्रेनला आग लागल्याने प्रवासी रेल्वेच्या डब्याला सुरक्षिततेसाठी ढकलताना दिसले.
हे ही वाचा<< काळाशी सामना, पण…; मृत्युमुखातून काढले बाहेर; रेल्वेस्थानकावरील जीवघेणा थरार, VIDEO व्हायरल
निष्कर्ष: बिहारच्या किउल जंक्शनवर ट्रेनला जळत्या बोगींपासून वेगळे करण्यासाठी प्रवाशांनी ट्रेन ढकलल्याचा व्हायरल व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामुळे व्हिडीओ खरा आहे हे सिद्ध होत असलं तरी प्रवासी ट्रेन सुरु करण्यासाठी ट्रेन ढकलत असल्याचा दावा चुकीचा आहे.