People Beaten Outside Masjid Viral Video: लाइटहाऊस जर्नलिझमला एका मशिदीबाहेर पोलिसांनी लोकांना मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात असल्याचे लक्षात आले. व्हिडीओमध्ये असाही दावा केला जात होता की, मशिद दहशतवादाचे स्रोत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांकडून लोकांना मारहाण केली जात आहे. तपासादरम्यान असे आढळून आले की २०२० मधील एका घटनेचा व्हिडीओ जेव्हा कोविड निर्बंध लादले गेले होते त्याचा या आता व्हायरल होणाऱ्या व्हिडीओशी जवळून संबंध आहे. नेमकं हे प्रकरण काय, चला पाहूया..

काय होत आहे व्हायरल?

X यूजर Haifami ने व्हायरल दाव्यासह हा व्हिडीओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.

https://twitter.com/xuanhaifami/status/1798852372485333154

इतर वापरकर्ते देखील असाच दावा करत व्हिडीओ शेअर करत आहेत.

https://twitter.com/GenXsmash777/status/1795786763773874688

तपास:

आम्ही व्हिडीओ डाउनलोड करून आणि InVid टूलमध्ये अपलोड करून तपास सुरू केला. आम्ही व्हिडीओमधून अनेक कीफ्रेम मिळवल्या आणि त्यावर रिव्हर्स इमेज सर्च चालवला. या प्रक्रियेमुळे आम्हाला काही बातम्या मिळाल्या ज्यात मोठ्या प्रमाणात शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दर्शविल्याप्रमाणे समान व्हिज्युअल्स दिसत आहेत.

https://www.livehindustan.com/national/story-karnatka-police-thrash-muslims-outside-a-mosque-for-violating-coronavirus-lockdown-3109419.html

२६ मार्च २०२० रोजी livehindustan.com वर अपलोड केलेल्या एका बातमीत नमूद करण्यात आले आहे की, लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या आणि नमाज अदा करण्यासाठी मशिदीत पोहोचलेल्या लोकांना पोलिसांनी मारहाण केली. ही घटना कर्नाटकातील बेळगावची असल्याचे सांगण्यात येत आहे.आम्हाला द क्विन्ट नावाच्या एका वेबसाईट वर देखील हि बातमी सापडली.

https://hindi.thequint.com/news/india/police-thrash-for-violating-coronavirus-lockdown-in-belgaum

२०२० मध्ये प्रकाशित झालेल्या लोकमत टाइम्सच्या वेबसाइटवरही आम्हाला एक बातमी सापडली.

https://www.lokmattimes.com/national/police-thrash-people-in-karnatakas-belgaum-for-violating-lockdown/

बातमीत नमूद केले आहे: देशभरात लॉकडाऊन लागू असूनही मशिदीत नमाज अदा करण्यासाठी गेलेल्या लोकांना पोलिसांनी मारहाण केली. एका व्हिडीओमध्ये पोलिस कर्मचारी नमाज पठण केल्यानंतर बाहेर पडत असणाऱ्या लोकांना काठ्यांनी मारत असल्याचे दिसतेय.

आम्हाला एएनआयच्या वेबसाइटवर बातमीचा अहवाल देखील सापडला.

https://www.aninews.in/news/national/general-news/police-thrash-people-in-karnatakas-belgaum-for-violating-lockdown20200326225613/

आम्हाला २६ मार्च २०२० रोजी ANI X हॅण्डलवर अपलोड केलेल्या घटनेचा व्हिडीओ देखील सापडला.

कॅप्शनमध्ये म्हटले आहे (अनुवाद): कर्नाटकाच्या बेळगावमध्ये करोना व्हायरसचा प्रसार वाढत असताना लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याबद्दल पोलिसांनी लोकांना मारहाण केली. नमाज अदा करून लोक निघत असताना मशिदीबाहेर ही घटना घडली.

हे ही वाचा<< Fact Check: “मुस्लिमांकडून आंबेडकरांच्या पुतळ्याची तोडफोड, दलितांना मारहाण..”, चर्चेतील फोटोत मोठं सत्य लपवण्याचा प्रयत्न

निष्कर्ष: मशिदीमध्ये नमाज अदा करण्यासाठी लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या लोकांना पोलिसांनी मारहाण केल्याचा जुना व्हिडिओ अलीकडचा सांगून व्हायरल झाला आहे. व्हायरल दावे दिशाभूल करणारे आहेत.