Viral Video Today: मागील काही काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून भांडणे ते मोठमोठे गुन्हे सुद्धा व्हिडिओच्या रूपात व्हायरल होत असतात. अलीकडेच इंडिगोच्या विमानात प्रवासी व हवाई सुंदरीमध्ये झालेली बाचाबाची सुद्धा प्रचंड चर्चेत राहिली. आता पुन्हा एकदा ट्विटरवर विमानात झालेल्या भांडणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. बरं हे भांडण केवळ शाब्दिक नसून त्यात दोन भारतीयांनी चक्क हाणामारी सुरु केली आहे. प्राप्त माहितीनुसार हा व्हिडीओ बँगकॉक ते कोलकाता या विमान प्रवासाच्या दरम्यानचा आहे.
मंगळवारी बँकॉकहून कोलकाताकडे प्रवास करणाऱ्या थाई स्माईल एअरवेजच्या विमानात दोन भारतीय प्रवासी मारामारीवर उतरले होते. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, दोन पुरुष एकमेकांशी वाद घालताना दिसत आहेत तर एक फ्लाइट अटेंडंट परिस्थिती सांभाळून घेण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहे. एक जण दुसऱ्याला “हाथ नीचे कर” म्हणत धमकावायला सुरुवात करतो.
सहप्रवासी आणि केबिन क्रू भांडण थांबवण्याचा प्रयत्न करण्याआधीच हा वाद मारामारीत बदलतो. यानंतर भांडणात एक जण स्वतःचा चष्मा काढतो आणि दुसऱ्याला मारायला सुरुवात करतो. थोड्याच वेळात या दोघांमध्ये तुंबळ हाणामारी सुरु होते.
तू हात खाली ठेव.. विमानात तुंबळ हाणामारीचा Video Viral
हे ही वाचा<< Video: ‘ती’ थरथरत होती पण ‘तो’ इतका गर्विष्ठ की..विमानात प्रवासी व हवाई सुंदरीमध्ये खडाजंगी; म्हणाला, “तू नोकर..”
दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला अशाच एका घटनेत, इस्तंबूलहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचा एक व्हिडिओ समोर आला होता जिथे एक प्रवासी आणि फ्लाइट अटेंडंट यांच्यात जोरदार भांडण झाले होते. प्रवाशांच्या उद्धटपणामुळे त्रासलेल्या हवाई सुंदरीने मी तुमची नोकर नाही असे म्हणून या वादात प्रवाशाला सुनावले होते. यानंतर इंडिगोने प्रतिक्रिया देत आम्ही या घटनेचा तपास करत आहोत असे सांगितले होते. अनेकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत हवाई सुंदरीची पाठराखण केली होती.