पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या शिर्डीपर्यंतच्या ५२० किलोमीटर टप्प्याचे लोकार्पण करण्यात आलं. या लोकार्पण सोहळ्याला राज्यपाल भगतिसंह कौश्यारी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. मोदींच्या स्वागतासाठी ढोल ताशाचे पथक तैनात करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान मोदींनाही ढोलवादनाचा मोह टाळता आला नाही. मोदींनीही ढोलवादन करणाऱ्या एका तरुणाच्या खांद्यावर हात ठेऊन ढोल वादनाचा आनंद घेतला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खापरी येथे मेट्रो मार्गिकेच्या उद्गाटनाचा कार्यक्रम आटोपून पंतप्रधान ‘समृद्धी’च्या वायफळ टोल नाक्याजवळ असलेल्या कार्यक्रम स्थळी आले. तेथे त्यांच्या स्वागतासाठी ढोलपथक तैनात होतं. या ढोल पथकामधील तरुणांचा उत्साह आणि वादन पाहून मोदींनीही ढोलवादन केलं. या ढोल-ताशा पथकातील एका तरुणाजवळ जात मोदींनी स्वत: ढोलवादन केलं.

पंतप्रधान कार्यालयाच्या ट्वीटर हॅण्डलवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. “पंतप्रधान मोदींचं नागपूरमध्ये पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आलं,” अशा कॅप्शनसहीत हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

नक्की वाचा >> रुळांवरील ‘विमान प्रवास’! मोदींनी नागपूरमध्ये हिरवा झेंडा दाखवलेली ‘वंदे भारत एक्सप्रेस’ आहे फारच खास; जाणून घ्या या ट्रेनबद्दल

नक्की पाहा हे फोटो >> फडणवीसांनी चालवलेल्या आलिशान Mercedes-Benz कारची किंमत पाहून व्हाल थक्क! ९ गेअर, ९ एअरबॅग, BJP कनेक्शन अन्…

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१५ मध्ये ७०१ किलोमीटरच्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाची घोषणा केली होती. त्यावेळी एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री होते. आता ते मुख्यमंत्री आहेत व फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत. उद्घाटनाच्या वेळी मोदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. 

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video pm modi inaugurates the phase one of maharashtra samruddhi mahamarg tried his hands on dhol scsg