Police Man Molest Young Girl: सोशल मीडियामुळे अनेकदा लोकांचा खरा चेहरा समोर येतो. काँग्रेस नेत्या संगीता शर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून अशाच एका पोलीस कर्मचाऱ्याचा पर्दाफाश केला आहे. या व्हिडिओमध्ये पोलीस कर्मचारी चक्क रात्री एका तरुणीचा विनयभंग करत असल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहून आता रक्षकच भक्षक झाले आहेत अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहे. इंटरनेटला हादरवून सोडणाऱ्या व्हिडिओमध्ये मोटारसायकलवर बसलेला एक पोलिस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका महिलेचा विनयभंग करताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पोलीस महिलेला पकडून तिला अयोग्यरित्या स्पर्श करताना दिसत आहे. मध्य प्रदेशातील हौनमानगंज पोलीस स्टेशन परिसरात ही लाजीरवाणी घटना समोर आली आहे. मुलगी स्वतःला त्याच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसते. खूप प्रयत्नांनंतर ती स्वत:ला त्या हैवानाच्या तावडीतून सोडवण्यास यशस्वी होते परंतु गणवेशातील माणूस दुचाकीवर तिच्या मागे येतो. अशात घाबरलेली मुलगी रस्त्याच्या पलीकडे पळते.

काँग्रेस नेत्या संगीता शर्मा यांनी हा व्हिडीओ शेअर करत असतात भाजपच्या राज्यात हे काय घडत आहे असे म्हणत मोदी सरकारवर सुद्धा टीका केली आहे.

VIDEO: ‘ती’ घाबरून विनवण्या करत होती पण ‘तो’ हैवान…

हे ही वाचा<< भडकलेली मगर अंगावर धावून येताच महिलेच्या ‘या’ एका कृतीने घडला चमत्कार; Video पाहून व्हाल थक्क

दरम्यान, या घटनेने सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. नेटकऱ्यांनी आरोपी पोलिसाला तत्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे.या पोलिसांमुळे भारतीय पोलिसांची प्रतिमा मलिन होत आहे. याबाबत ठोस पावले उचलण्याची गरज आहे अशा कमेंट्स या व्हिडिओवर पाहायला मिळत आहेत.