Viral Video: आजवर आपण महाभारतात अभिमन्यू कसा आईच्या पोटातून युद्धशास्त्र शिकून आला होता याच्या कथा ऐकल्या आहेत. पण आज असंच काहीसं उदाहरण सोशल मीडियावर प्रत्यक्ष पाहायला मिळत आहे. अनेक महिलांना गर्भारपणात प्रचंड त्रास होतो त्यामुळे पूर्ण पूर्ण दिवस त्या कसलीही हालचाल न करता काढतात. काही प्रकरणांमध्ये डॉक्टरच पूर्ण बेड रेस्ट म्हणजेच आरामाचा सल्ला देतात, असं असलं तरी बहुतांश वेळा व्यायाम व हालचाल करून गरोदर महिलेने ऍक्टिव्ह राहणेच उत्तम ठरते असेही वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. अशाच एक गरोदर महिलेचा एक व्हिडीओ सध्या ऑनलाईन व्हायरल होत आहे. या व्हिडिओमधील महिलेची शक्ती पाहून अनेकजण तिला आई द वंडर वुमन असेही म्हणत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हिडिओमध्ये केलेल्या दाव्यानुसार या महिलेने गरोदरपणातील नऊ महिने प्रत्येक दिवशी जिममध्ये जाऊन व्यायाम केला होता. अगदी हेव्ही लिफ्टिंग पासून ते स्क्वाट्स पर्यंत सगळे व्यायाम ती या व्हिडिओमध्ये सुद्धा करताना दिसत आहे. यानंतर या महिलेने आपल्या नवजात बाळाचा फोटो शेअर केला तर त्यात या बाळाचे हात एखाद्या बॉडी बिल्डरसारखे मस्क्युलर असल्याचे दिसत आहेत. व्हिडिओच्या कॅप्शनवरून ही महिला युके मधील रहिवाशी असून @yoanabanda या अकाऊंटवरून हा मूळ व्हिडीओ शेअर करण्यात आला होता.

जन्माला आलं ‘असं’ बाळ

हे ही वाचा<< झेब्र्याची मान दातात धरून निघाली सिंहीण! प्राण्याने डोकं लावून झटक्यात तिला पार वेड्यात काढलं, Video पाहा

दरम्यान हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पहिला आहे. अनेकांनी यावर आश्चर्य व्यक्त केलं आहे. काहींनी तर चांगलं आहे पण मग व्यायामासह पुस्तक वाचली असती तर बाळ डॉक्टरच बनून आलं असतं असंही मजेत म्हंटल आहे. हा व्हिडीओ खरा- खोटा असला तरी अशा प्रकारचे स्टंट गरोदरपणात करण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video pregnant women squats heavy lifting gives birth to muscular baby internet is shocked viral clip trending svs
Show comments