Viral Video: भारतात गाड्या आणि त्यामागील स्लोगन खूप व्हायरल होतात. गाड्यांच्या मागे वेगवेगळ्या प्रकारच्या पाट्या पाहून, या सगळ्याच गाड्या पुण्याच्याच आहेत की काय, असाही प्रश्न पडतो. ‘मेरा भारत महान’ आणि ‘हॉर्न ओके‘ तर जवळजवळ प्रत्येक ट्रकच्या मागे लिहिलेलंच असतं. त्याशिवाय काही ट्रकवाले, ऑटोचालकांच्या आत लपलेली कला याच पाट्यांद्वारे दिसून येते. जसं की, शेरो शायरी, म्हणी, टोमणे. दुसऱ्यांवर आपल्या गाडीचा प्रभाव पाडण्यासाठी असो किंवा आवड म्हणूनही गाड्यांच्या मागे अशी वाक्यं लिहिणं हा एक कायमचा ट्रेंड झाला आहे. दरम्यान, अशाच एका पुण्यातील रिक्षाचा मागे लिहिलेलं वाक्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या रिक्षाचा फोटोही सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलही होतोय. या रिक्षाच्या मागे ज्यांनी आयुष्यात कर्ज घेतलं अशा लोकांसाठी खास मेसेज लिहला आहे. हे वाचून तुम्हीही सगळं टेंशन विसरुन जाल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रस्त्यावरुन प्रवास करताना अनेकदा ऑटोरिक्षावर, टॅक्सी किंवा बाईक्सच्या मागे काही भन्नाट कोट्स लिहिलेले असतात, जे वाचून अनेकदा खूप हसायला येते. तसेच प्रश्नही पडतो की, या लोकांना एवढं भन्नाट लिहायला सुचत कसं… पण काहीवेळी रिक्षा किंवा काही वाहनांच्या मागे असे काही कोट्स लिहिलेले असतात जे फार भावनिक असतात किंवा तुम्हाला विचार करायला भाग पाडतात, तसेच तुम्हाला तुमच्या आयुष्यातील व्यक्तींबरोबरच्या आठवणी ताज्या करतात. त्यामुळे असे कोट्स नेहमीच लोकांचेही लक्ष वेधून घेतात. सध्या असाच एका रिक्षावरील कोट्सचा फोटो व्हायरल होत आहे.

या ऑटोचालकाने आपल्या ऑटोच्या मागे असा संदेश लिहिला आहे की, तो पाहिल्यानंतर सगळं टेंशन विसरुन जाल. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, त्या रिक्षाच्या मागे, असं लिहिलंय तरी काय? रिक्षाच्या मागे लिहिलंय की, “ज्याच्या डोक्यावर कर्ज तोच खरा मर्द”

पाहा व्हिडीओ

पुणे तिथे काय उणे, असं म्हटलं जातं. पुणेकर त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण तिरकस स्वभावामुळे चारचौघांत उठून दिसतो. त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या हा नेहमीच चर्चेचा विषय ठरत आला आहे. आता हेच पाहा ना, एका रिक्षाच्या मागे लिहलेल्या मेसेजने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video punekar ricksha owner special message for people who have taken loans in life it is written on the back of the rickshaw that you will forget all the tension after reading it srk