अलीकडेच, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये काही पुरुष कुत्र्याच्या पिल्लाला व्हिस्की पाजताना दिसत आहेत. या व्हिडिओवर आता सोशल मीडिया वापरकर्ते आणि प्राणी प्रेमींकडून तीव्र टीका आणि निषेध करण्यात आला आहे. हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये मोकळ्या जागेत शेकोटीभोवती बसलेल्या पुरुषांचा एक गट देखील दिसत आहे आणि एका काचेच्या ग्लासामध्ये पिल्लाला मद्य देताना दिसत आहे. कुत्र्याचे पिल्लू मद्य पित आहे. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती मोबाइलमध्ये शुटिंग करताना दिसत आहे. ट्विटमध्ये या व्यक्तीच्या फेसबूकअकांउटची माहिती दिली आहे ज्यामध्ये राजस्थानच्या सवाई माधोपूर भागात राहत असून त्याचे नाव “शेरू बोरदा” असल्याचे दिसत आहे. दरम्यान राजस्थान पोलिसांनी या ट्विटरवर लवकर कारवाई केली आणि स्थानिक पोलिसांना तातडीने लक्ष घालण्याचे निर्देश दिले. पोस्टवर प्रतिक्रिया देताना स्थानिक पोलिसांनी कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.

mauled dog in Chikhli bitten many causing fear among residents
चिखलीत पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस; ३० जणांना चावा
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Golden fox and stray dogs coexist in Kharghar Mumbai print news
खारघरमध्ये सोनेरी कोल्हा आणि भटक्या कुत्र्यांचा एकत्र वावर
justice shekhar yadav controversial statement
अन्वयार्थ : ‘सांविधानिक भावना दुखावण्या’पल्याड…
attack by a wild dog on a deer
‘शेवटी मरण चुकवता येत नाही…’ हरणावर जंगली कुत्र्याचा क्रूर हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप
career animal love
चौकट मोडताना : प्राणिप्रेमाची धास्ती
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
Dog Vs Chicken Fight See Who Will Win Animal Video Viral surprise after result dog scared from this bird watch viral video
“हरला तोच आहे, जो लढला नाही” कुत्रा करत होता कोंबड्याची शिकार पण १० सेकंदात पलटली बाजी; VIDEOचा शेवट पाहून व्हाल थक्क

कुत्र्यांना मद्य कधीही का देऊ नये?
“कोणत्याही कुत्र्याच्या प्रजातींना कधीही मद्य देऊ नये कारण त्यांच्या चयापचय प्रक्रियेत मद्य सुरक्षितपणे पचवले जाऊ शकत नाही” हे लक्षात घेणे अत्यंत महत्वाचे आहे. कुत्र्यांमध्ये मद्य प्रभावीपणे पचवण्यासाठी आवश्यक एंजाइम नसतात त्यामुळे पेये, खाद्यपदार्थ किंवा घरगुती उत्पादने असे विविध प्रकार ज्यामध्ये मद्याच अंश आहे हे त्यांच्यासाठी संभाव्यत: हानिकारक आणि विषारी असतात.

हेही वाचा – जुगाड असावा तर असा! ‘या’ चुलीवर गिझरपेक्षाही झटपट गरम होते पाणी; Viral Video एकदा बघाच

कुत्र्यांनी मद्याचे सेवन केल्याने त्यांच्यामध्ये आळशीपणा(lethargy), श्वसनसंबधीत नैराश्य (respiratory depression)आणि शरीराचे तापमान धोकादायकपणे कमी होणे यासह प्रतिकूल परिणाम होऊ शकतात.

तुमच्या पाळीव कुत्र्याच्या भल्यासाठी, त्यांना बिअर, वाईन किंवा मद्य यासारख्या कोणत्याही अल्कोहोलयुक्त पेयांपासून दूर ठेवण्यासाठी दक्ष राहणे अत्यावश्यक आहे. शिवाय, कच्च्या पीठासारख्या ( raw bread dough) खाद्यपदार्थांसह सावधगिरी बाळगा, कारण त्यात मद्याचा अंश असू शकतो.

हेही वाचा – दाट धुक्यामध्ये जीव मुठीत घेऊन लोको पायलटने चालवली ट्रेन: अंगावर काटा आणणारा Video Viral

नेटकऱ्यांनी व्यक्त केला रोष

सोशल मीडियावर कुत्र्यांच्या पिल्लाला मद्य पाजल्याबद्दल अनेकांनी रोष व्यक्त केला. संबधित आरोपीच्या कृत्यावर टिका केली.

X वर एका वापरकर्त्याने राजस्थान पोलिसांना टॅग करत लिहिले, “पिल्लू मरू शकते. हे लोक अमानवी आहेत.”

Story img Loader