Shocking video : साप, अजगर हे शब्द जरी उच्चारले तरी अंगावर काटा येतो. मानवी वस्तीत अनेकदा साप किंवा अजगर आढळून येतात. सोशल मीडियावर याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहिल्यानंतर अंगावर काटा येतो.सध्या असाच एक जंगलातला व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका अजगराचा थराराक व्हिडीओतून समोर आलाय. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीही सुन्न व्हाल. एका महाकाय अजगराने ५४ वर्षीय महिलेला जिवंत गिळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यानंतर अजगराची हत्या करून महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. याचा व्हिडीओ सध्या समोर आला असून पाहून तुमचाही थरकाप उडेल.
हा अजगर जेव्हा लोकांना दिसला तेव्हा त्याचे पोट फुगले होते. यानंतर या लोकांनी अजगराला ठार मारले, नंतर कापून महिलेचा मृतदेह बाहेर काढला. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, फुगलेल्या अजगराला लोक फाडत आहेत. हा अजगर इतका फुगला आहे की, त्याला जागेवरुन पुढे सरकताही येत नाहीये. अशावेळी लोकांनी अजगराला ठार मारले आणि महिलेचा मृतदेह बाहेर काढला.
खरंतर, अशा महाकाय अजगरांना त्यांचे शिकार गिळण्यास कित्येक आठवडे लागतात. पण या अजगराने महिलेचे कपडे चघळण्यापर्यं तिच्या शरीराचा बराचसा भाग गिळला होता. अजगराने चावा घेतल्याने ही बाब समोर आली. या घटनेनंतर स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, कारण अलीकडच्या काळात त्यांच्या परिसरात अनेक मोठे साप दिसले आहेत. इंडोनेशियामध्ये लांब आकाराचे अजगर मोठ्या प्रमाणात आढळतात. हे अजगर जंगलात आढळतात आणि मुख्यतः प्राण्यांना लक्ष्य करतात. यापूर्वी 2017 मध्ये अकबर सलुबिरो नावाच्या व्यक्तीचा मृतदेहही अजगराचे पोट फाडून बाहेर काढण्यात आला होता. पश्चिम सुलावेसी येथे अजगराने त्याला जिवंत गिळले होते.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> ‘तू माझी झाली नाहीस तर…’ लग्नास नकार दिल्याने महिलेची भररस्त्यात तलवारीने वार करून हत्या; थरारक VIDEO समोर
जगात सापांच्या अनेक प्रजाती आहेत. लहान साप लोकांना त्यांच्या विषाने मारतात, तर मोठे साप त्यांच्या भक्ष्याला गुंडाळून त्याची हाडं तोडून त्यांना जिवंतच गिळतात. जंगलात राहणारे अजगर बहुधा लहान प्राण्यांना त्यांची शिकार बनवतात. पण आता माणसाने जंगल तोडून त्यात आपलं घर बनवायला सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत महाकाय साप आता माणसांच्या जवळ पोहोचायला लागले आहेत. याच कारणामुळे मानवांवर अजगराच्या हल्ल्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे.