Woman Dancing Viral Video: लाजून, मान खाली घालून, हलकंच हसून राहते ती बाई. असा एक उगाच अंगावर थोपलेला नाजूकपणा वर्षानुवर्षे अनेक महिलांनी सोसला आहे. पण आता अलीकडे व्हायरल होणाऱ्या अनेक व्हिडीओमधून बिनधास्त बेभान नाचणाऱ्या महिला सगळयांना थक्क करत आहेत. अशाच एका लग्नातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. लाल साडी नेसलेली एक महिला भन्नाट मूव्ह्ज दाखवून नाचत आहे. तिचा डान्स पाहून आजूबाजूला जमलेली गर्दीही थक्क झाली आहे.
तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की सुरुवातीला सगळ्याच महिला छान तयार होऊन नाचत आहेत पण यातील एक बाई मध्येच येऊन अशी काही नाचू लागते की इतरांना सुद्धा थांबून तिचा डान्स बघणायचा मोह काही आवरत नाही. अवघ्या काही सेकंदाच्या या व्हिडीओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
Video: वरातीत काकूंचा जलवा
दरम्यान, @nepaltiktok या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केल्यापासून यावर ११ लाखाहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. अनेकांनी कमेंट करून या महिलेच्या डान्स मूव्ह्जचे कौतुक केले आहे. काकूंनी मायकल जॅकसन पासून ते बॉलिवूडच्या गोविंदापर्यंत सगळ्या स्टाईल एकत्र करून भन्नाट डान्स केला आहे असेही काहींनी कमेंटमध्ये म्हंटले आहे.
हे ही वाचा<< Video: गर्दीत बाईकवर अश्लील कृत्य करणारं जोडपं झालं Viral; अटकेनंतर मुलीचं वय ऐकून पोलिसही थक्क
यापूर्वीही अनेक वरातीत वऱ्हाड्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते पण या काकूंची स्टाईल नक्कीच लक्षात राहण्यासारखी आहे, तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटलं कमेंट करून नक्की कळवा.