US Embassy Republic Day Wishes: भारतातील यूएस दूतावासाने 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरमचे मधुर सादरीकरण शेअर करून शुभेच्छा दिल्या.ट्विटरवर व्हिडिओ शेअर करताना, दूतावासाने म्हटले आहे की यूएस अधिकारी राघवन आणि स्टेफनी यांनी २०२३ च्या ग्रॅमी पुरस्कार नामांकित अल्बमच्या गायिका पवित्रा चारी यांच्यासह वंदे मातरमचे सादरीकरण केले आहे. यात राघवन हे बासरी वाजवताना तर स्टेफनी या गिटार वाजवताना दिसत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमेरिकेचे राज्य सचिव अँटोनी ब्लिंकन यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त भारताला शुभेच्छा दिल्या आणि म्हणाले, “भारत आणि युनायटेड स्टेट्समध्ये जगातील सर्वात मोठी व फायदेशीर भागीदारी आहे.” तसेच भारतातील इस्रायलचा दूतावासतील अधिकाऱ्यांनी सुद्धा प्रादेशिक भाषांमध्ये प्रिय भारतीय मित्रांना शुभेच्छा देऊन भारताचा समृद्ध वारसा आणि सांस्कृतिक विविधतेच्या उत्सवात सामील होतो,” असे ट्विट केले होते.

VIDEO: असा साजरा झाला होता भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन

भारत आज २६ जानेवारीला आपला ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. १९५० ला भारताचे संविधान अंमलात आणण्याच्या स्मरणार्थ प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो.प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन आणि शहीद वीरांना पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करून झाली होती. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्लीतील कर्तव्यपथावरून प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाचे नेतृत्व केले. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत.

Republic Day 2023: आदिशक्तीचा उदो उदो; महाराष्ट्राच्या चित्ररथात गाजला नारीशक्ती आणि देवीचा गजर, पाहा Video

दरम्यान, सेंट्रल व्हिस्टाच्या नूतनीकरणानंतर पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनाचा सोहळा आयोजित केला जात आहे तसेच गेल्या वर्षी राजपथचे नाव बदलून कर्तव्य पथ केल्यावर हा पहिलाच राष्ट्रीय सण आहे. यामुळे यंदा प्रजसत्ताक दिन अधिक जोशात साजरा केला गेला.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video republic day wishes by us embassy with rendition of vande mataram by grammy award nominee pavitra chari svs