चित्रपटसृष्टी ही आपल्या समाजाचा एक महत्त्वाचा भाग आहे. चित्रपटाच्या माध्यमातून आपण अनेक कथा, संगीत, आत्मकथांचा आस्वाद घेतो. चित्रपट हे आपल्या समाजाचा आरसा आहे असं म्हणतात. गेली कित्येक वर्ष अनेक उत्तमोत्तम चित्रपट बनत आले आहेत आणि प्रेक्षकांनीही त्यांना भरभरून प्रेम दिले आहेत. आजवर अनेक अजरामर चित्रपट तयार झाले आहेत आणि अजूनही होत आहेत. सध्या अशाच एका चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळतेय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दाक्षिणात्य दिग्दर्शक एस.एस. राजमौली यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘आरआरआर’ या चित्रपटाने कमाल केली आहे. दाक्षिणात्य अभिनेता राम चरण आणि ज्युनियर एनटीआरच्या ‘आरआरआर’ या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर ११०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. अजूनही या चित्रपटाची क्रेझ कायम आहे. प्रेक्षकही या चित्रपटाला भरभरून प्रेम देत आहेत. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांनी चित्रपटगृहात नाचत गाजत चित्रपट पाहिला त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

किली पॉलच्या कुऱ्हाडीसोबच्या अ‍ॅक्शन सीनवर नेटकरी झाले फिदा! बघा Viral Video

सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका चित्रपटगृहात शूट करण्यात आला असून यावेळी आरआरआर चित्रपट सुरु असल्याचे पाहायला मिळते. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की या चित्रपटातील प्रसिद्ध गाणे ‘नाचो..नाचो’ सुरु आहे. हे गाणं सुरु असतानाच दोन मुलं उठून उभे राहतात आणि राम चरण आणि ज्युनियर एनटीआरच्या डान्सच्या स्टेप्स फॉलो करतात. विशेष म्हणजे त्यांचा डान्स अगदीच राम चरण आणि ज्युनियर एनटीआरच्या सारखा वाटतो. ही मुलं नाचत असताना चित्रपटगृहात टाळ्या आणि शिट्ट्यांचा आवाज आपण ऐकू शकतो.

Sachin Tendulkar Birthday : सचिन तेंडुलकर पाकिस्तानसाठी भारताविरुद्ध मैदानात उतरला होता! नेमकं असं काय घडलं होतं?

स्टंटच्या नादात या मुलासोबत झाले असे काही…; Viral Video पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

या दोन मुलांचा डान्स खूपच सुंदर आणि अगदी एनर्जेटिक होता. shailesh_atz या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला ८ लाख ६१ हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. नेटकऱ्यांनी या दोन्ही मुलांच्या डान्सचे विशेष कौतुक केले आहे.