RSS Extends Support To Congress & INDIA in Loksabha Election: लोकसभा निवडणुका तोंडावर असताना लाइटहाऊस जर्नालिज्मला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येत असलेली पोस्ट आढळून आली. पोस्टमध्ये दावा करण्यात आला होता की RSS, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पत्रकार परिषदेत आगामी निवडणुकांसाठी काँग्रेस आणि INDI आघाडीला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. तपासादरम्यान, या पोस्टची वेगळी बाजू समोर आली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
काय होत आहे व्हायरल?
X user @preetiagr123 ने व्हायरल दावा शेअर केला.
इतर यूजर्स देखील हा दावा शेअर करत आहेत.
तपास:
आम्ही सुरुवातीला हा व्हिडीओ नीट तपासला. आवाज इंडिया टीव्हीवर पोस्ट केलेल्या व्हिडिओचे शीर्षक होते: Nagpur: RSS ने दिया कांग्रेस को समर्थन, देशभर में मचा बवाल PC of RSS Chief Janardan Moon, Abdul Pasha. पण यातील एक ठळक दिसणारी बाब म्हणजे कॅप्शन व व्हिडिओमध्ये जे नाव दिसलं ते जनार्दन मून संघाचे सरसंघचालक नसून डॉ.मोहन भागवत आहेत.
व्हिडीओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिहिलं होतं की: RSS ने INDIA युतीला समर्थन दिल्याने ज्यांना आश्चर्य वाटत आहे त्यांना सांगू इच्छितो की या देशात दोन आरएसएस आहेत. एक जे ऑनलाईन नोंदणीकृत आहे ज्यांनी इंडिया आघाडीला पाठिंबा दिला आहे आणि दुसरं म्हणजे नोंदणीकृत नसलेले आरएसएस ज्याचे सर संघचालक मोहन भागवत आहेत. हा फरक लक्षात घ्या, संभ्रमात राहू नका. Nagpur ፤ RSS given unconditional support to INDIA Alliance
तर, यावरून हे स्पष्ट झाले की ज्या आरएसएसबाबत या व्हिडिओमध्ये चर्चा होतेय त्याचे अध्यक्ष डॉ मोहन भागवत नाहीत. त्यानंतर आम्ही जनार्दन मून यांच्या नेतृत्वाखालील आरएसएसबद्दल शोध घेतला. आम्हाला या विशिष्ट RSS बद्दल काही बातम्या सापडल्या.
या आरएसएसची स्थापना नागपूरचे माजी नगरसेवक जनार्दन मून यांनी केली होती.
‘स्वतःचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) नोंदणी करण्याची जनार्दन मून यांची याचिका २०१७ मध्ये फेटाळण्यात आली होती. धर्मादाय आयुक्त कार्यालयातील सोसायट्यांच्या तत्कालीन उपनिबंधक करुणा पात्रे यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना “लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होईल”, असे सांगितले होते.
एका बातमीत ज्येष्ठ RSS नेते आणि तत्कालीन अखिल भारतीय प्रचारप्रमुख मनमोहन वैद्य म्हणाले होते, “अशी नाटकं महत्त्वाची नाहीत. धर्मादाय आयुक्तांना या विषयावर निर्णय घेऊ द्या.”
तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही आरएसएसचे अखिल भारतीय सह प्रचार प्रमुख नरेंद्र कुमार यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले, “ही फेक न्यूज आहे. अशी कोणतीही पत्रकार परिषद आरएसएसने आयोजित केलेली नाही. हा फक्त लोकांना भ्रमित करण्याचा प्रयत्न आहे.”
हे ही वाचा<< अरविंद केजरीवालांच्या अटकेनंतर रस्त्यावर उद्रेक? समोर आली नवी माहिती, लोक निषेधाला उतरले पण…
निष्कर्ष: आगामी निवडणुकांसाठी आरएसएसने काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला नाही. यासंदर्भात पत्रकार परिषद घेणारी आरएसएस ही नागपूरचे माजी नगरसेवक जनार्दन मून यांच्या अध्यक्षतेखालील वेगळी संघटना आहे. व्हायरल दावे दिशाभूल करणारे आहेत.