Viral Video Today: महिलांच्या ड्रायव्हिंगला नावं ठेवणारी अनेकजणं तुम्ही पाहिली असतील. या अहंकारी पुरुषांना अनेकांनी सुनावले सुद्धा आहे. पण मागील काही प्रसंगांमध्ये ड्रायव्हिंग वरून होणारी टीका सिद्ध करण्याचे काम काही तरुणी करत आहेत. तुम्ही आता सुद्धा सोशल मीडियावर स्कुटी गर्ल असं सर्च केलं तरी तुम्हाला कधी खांबाला आदळून, कधी स्टंटबाजी करताना खाली कोसळून व्हायरल झालेल्या अनेक तरुणींचे व्हिडीओ फोटो दिसतील. असाच एक प्रकार सध्या नव्याने व्हायरल होत आहे. यामध्ये एका तरुणीने स्कुटी चालवताना तोल गेल्याने चक्क एका गजराजांना टक्कर दिली आहे. मग व्हिडिओमध्ये स्कूटीवर जाणाऱ्या तरुणीसोबत असं काही घडलं की सगळेच थक्क झाले.
व्हायरल व्हिडिओमध्ये रात्रीच्या वेळी एक हत्ती आणि काही लोक रस्त्यावर उभे असल्याचे दिसत आहे. तुम्ही पाहू शकता, की एक व्यक्ती हत्तीच्या वर बसलेली आहे, तर इतर दोन लोक दोरी घेऊन काहीतरी करत आहेत. तितक्यात स्कूटीवर एक मुलगी तिथे येते आणि सरळ हत्तीला येऊन धडकते. टक्कर इतकी जोरदार होती की माहुत दूरवर पडल्याचं व्हिडिओमध्ये दिसतं. व हे सगळं बघून हत्ती तिथून पळ काढताना दिसत आहे.
हे ही वाचा<< पोटाचे फॅट्स झटक्यात कमी करण्याचा मजेशीर जुगाडू फंडा! Video पाहून लोकं म्हणतायत, “या देशात काय होईल..”
दरम्यान, इन्स्टाग्रामवर @earth.reel नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यावर अनेकांनी मजेशीर कमेंट करत हत्ती स्कुटी चालवणाऱ्या मुलींना घाबरत असल्याचं कळतंय असे म्हंटले आहे. तर काहींनी या तरुणीची मस्करी करत “वाह्ह किती छान या मुलीने प्राण्यांची सुटका करायला स्वतःचा जीव धोक्यात घातला.”