चोर फक्त संधी शोधत असतात आणि संधी मिळताच चोरी करतात. दिवसाढवळ्या आणि लोकांच्या गर्दीतही चोर चालाकीने चोरी करतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. जे पाहून आपल्याला आश्चर्य वाटते. अलीकडच्या काळात असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.चोरीची ही पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. तुम्ही कधी चोराला रुमालाच्या साहाय्याने चोरी करताना पाहिलं आहे का? असाच काहीसा प्रकार दाखवणारा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. चोराने मुलीच्या समोरून सहज स्कूटीचो चोरी केली.
कशी केली चोरी?
तो चोर रस्त्याच्या कडेला स्कूटीला व्यवस्थित बघतो. स्कूटी लॉक होती. चोराने हटके आयडिया लावत निव्वळ रुमालाने स्कूटी चोरी करतो. गाडी सुरू होऊ नये म्हणून तो स्कूटीच्या सायलेन्सरमध्ये रुमाल अडकवतो आणि तेथून निघून जातो. ज्या मुलीची ही स्कूटी आहे ती तिथे येते. ती मुलगी स्कूटी सुरु करायचा प्रयत्न करते. मात्र मागे कापड लावल्यामुळे स्कूटी सुरू होऊ शकली नाही.
(हे ही वाचा: उडणाऱ्या हरणाला कधी बघितलं आहे का? राष्ट्रीय उद्यानातील Video Viral)
तिची स्कूटी सुरू न झाल्याने मुलगी गोंधळी. मुलीला अस्वस्थ पाहून चोरट्याने मुलीला मदत करण्याचा बहाणा केला. कोणी तरी मदतीला आलं आहे म्हणून तिने चोराला चावी दिली आणि स्वतः मोबाईलमध्ये बघू लागली. तेवढ्यात तो चोर चोरट्याने सायलेन्सरमधून रुमाल काढून स्कूटी सुरू करतो आणि स्कूटी घेऊन पळून जातो.
(हे ही वाचा: सिंहाने पाणी पीत असलेल्या हरणावर केला हल्ला आणि…;बघा व्हायरल व्हिडीओ)
(हे ही वाचा: Viral Photo: ४ की ६? फोटोमध्ये नक्की किती हत्ती आहेत?)
नेटीझन्सची प्रक्रिया
चोरीची ही अनोखी पद्धत पाहून नेटीझन्स आश्चर्यचकित झाले आहेत. या व्हिडीओला ५६ हजाराहून अधिक लोकांनी बघितलं आहे. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत.