अंकिता देशकर
Mahadev Bhakta Beaten By Police: ‘कंवरिया’ या नावाने ओळखल्या जाणार्या शिवभक्तांची वार्षिक यात्रा देशाच्या विविध भागात सुरू आहे. या उत्सवादरम्यान, लाइटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फिरत असलेला एक व्हिडिओ आढळला. पश्चिम बंगालमध्ये कंवरियांना (शिव भक्तांना) बंगाल पोलिसांकडून मारहाण होत असल्याचा दावा केला जात आहे.
काय होत आहे व्हायरल?
ट्विटर यूजर @maheshyagyasain ने आपल्या प्रोफाइल वर व्हायरल व्हिडिओ शेअर केला.
इतर वापरकर्ते देखील अशाच प्रकारच्या दाव्यांसह व्हिडिओ शेअर करत आहेत.
तपास:
आम्ही व्हायरल व्हिडिओ InVid टूलमध्ये अपलोड केला, याद्वारे आम्हाला विविध कीफ्रेम मिळाल्या. त्यानंतर आम्ही प्रत्येक कीफ्रेमवर गूगल रिव्हर्स इमेज सर्चचा वापर केला आणि इंटरनेटवर इमेज शोधल्या. १७ ऑगस्ट २०२१ रोजी अपलोड केलेल्या OpIndia लेखात आम्हाला एक कीफ्रेम आढळली.
आर्टिकल चे शीर्षक होते: West Bengal: Shiv Bhakts thrashed by cops outside Bhootnath temple, BJP compares situation in state to ‘Taliban Raj’ (पश्चिम बंगालः भूतनाथ मंदिराबाहेर शिवभक्तांची पोलिसांकडून पिळवणूक, भाजपकडून राज्याची ‘तालिबान राज’शी तुलना)
हे शब्द वापरून मग आम्ही याबद्दल अधिक बातम्यांचे अहवाल आणि व्हिडिओ शोधले. newsbharati.com या वेबसाइटवर आम्हाला आणखी एक बातमी सापडली.
2 वर्षांपूर्वी अपलोड केलेली bhaskar.com वरील एक बातमी सुद्धा आढळून आली.
अहवालात नमूद करण्यात आले आहे की, “सावन (श्रावण) महिन्याच्या सोमवारी बंगालमधील भूतनाथ मंदिराबाहेर जमलेल्या भाविकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला.”
अहवालात असेही म्हटले आहे की शिवभक्त अनेकदा भूतनाथ मंदिरात गर्दी करतात. कोविड -19 च्या दुसर्या लाटेनंतर, इतर मंदिरे पुन्हा उघडली गेली, परंतु भूतनाथ मंदिर बंदच होते आणि म्हणून भक्त मोठ्या संख्येने मंदिराबाहेर जमले, यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज करावा लागला.
आम्ही कीवर्ड शोध वापरून तपासले असता ट्विटर वापरकर्ता रितेश तिवारीने अपलोड केलेला व्हिडिओ सापडला.
युजरने १६ ऑगस्ट २०२१ रोजी व्हिडिओ ट्विट केला होता.
हे ही वाचा<< नाल्यात वाहून गेलेले चार महिन्यांचे बाळ जिवंत सापडले? २४ तासांनी अखेरीस समोर येतेय ‘ही’ माहिती
निष्कर्ष: पश्चिम बंगालमधील शिवभक्तांना मारहाण केल्याचा व्हिडीओ खरा जरी असला तरी तो जुना व्हिडिओ आहे.