Shocking Accident Video: वाहन हे प्रवासापेक्षा चैनीचं, दिमाखाचं आणि स्टंटबाजीचं माध्यम म्हणून अलीकडे नव्या पिढीच्या समोर येत आहे. मागील महिन्याभरातच बाईक चालवताना लोकांनी केलेल्या विचित्र स्टंटचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. कधी कोणी प्रेयसीला बाईकच्या टाकीवर बसवून फिरवतं तर कधी कुणी वाऱ्याच्या वेगाने गाडी चालवताना उभं राहून दाखवतं. तुम्ही नीट पाहिलंत तर यातील अनेकांनी ना हेल्मेट घातलेलं असतं ना आपल्या सुरक्षेची कोणती काळजी घेतलेली असते. असाच एका तरुणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. लोकं या व्हिडिओला बघून ही तरुणी खरंच स्वतःला ‘पापा की परी’ समजून गाडी चालवतेय अशी टीका करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंस्टाग्रामवर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की एक तरुणी आपल्या बाईकला हेलकावे देत उड्या मारत गाडी चालवत आहे. तिचा वेगही जरा जास्तच आहे. अचानक तिच्या मागून एक जोडपं सुद्धा बाईकवरून येतं आणि तितक्यात या तरुणीचं नियंत्रण सुटतं आणि दोन्ही गाड्यांची टक्कर होऊन सगळे रस्त्यावर खाली पडतात. या अपघातात कुणाला किती दुखापत झाली हे जरी कळलं नसलं तरी तिघांनाही मोठा मार बसला असणार हे स्पष्ट आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ शेअर करताना अनेकांनी यावर पापा की परी समजून गाड्या चालवता का? असा प्रश्न करत कॅप्शन दिले आहे. खरोखरच अशा अपघाताला लोकांचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे असे अनेकांनी म्हंटले आहे. या व्हिडिओला लाखो व्ह्यूज व हजारो कमेंट्स आहेत.

हे ही वाचा<< Video: भररस्त्यात बाईकवर बेभान जोडप्याने ओलांडल्या सर्व मर्यादा; ‘जो’ मध्ये पडला त्याची अशी झाली अवस्था..

काही दिवसांपूर्वी असाच एक व्हायरल व्हिडीओ भिवंडीतुन समोर आला होता. व्हिडिओमध्ये बुरखा घातलेली एक मुलगी मागे बसण्याऐवजी दुचाकीस्वाराच्या समोर बसलेली होती. अशा प्रसंगी अपघात झाल्यास नेमकी चूक कुणाची? तुम्हाला याविषयी काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा.