World’s Shortest Man: ईरानच्या अफशीन एस्माईल गदरजादेहची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची जगातील सगळ्यात लहान व्यक्ती म्हणून नोंद करण्यात आली आहे. अफशीनची उंची फक्त २ फूट १.६८ इंच एवढी आहे. अफशीनच्या आधी सगळ्यात लहान व्यक्ती म्हणून कोलंबियाच्या बोगोटामधील एडवर्ड नीनो हर्नांडेज याच्या नावे हा रेकॉर्डहोता . एडवर्डची उंची केवळ २ फूट ४.३८ इंच एवढी होती. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांनी तीन वेळा तपासणी केल्यावर अफनीशला सर्वात लहान व्यक्तीचा किताब दिला आहे. अफनीशची उंची जरी कमी असली तरी त्याची ख्याती आता जगभरात पोहोचली आहे. पण हा जगातील सर्वात लहान व्यक्ती नेमका खऱ्या आयुष्यात आहे तरी कसा हे जाणून घेऊयात..
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालेल्या नोंदींनुसार,अफशीनचे वय २० वर्ष आहे. त्याचे पूर्ण नाव अफशीन एस्माईल घादरजादेह असे असून त्याचा जन्म ईरानच्या पश्चिम अजरबैजान प्रांतातील बुकान काउंटी येथे झाला होता. अफशीनचे वजन अवघे ६.५ किलो इतके आहे. जगभरात प्रसिद्ध झालेल्या अफनीशच्या कुटुंबच आर्थिक परिस्थिती मात्र तंगीची आहे.
अफशीनने मुलाखतीदरम्यान सांगितले की, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा भाग असणं हे एखाद्या स्वप्नासारखं आहे. हा माझ्यासाठी आश्चर्याचा धक्काच होता. माझ्या उंचीमुळे मला कधीही आपल्यात कमतरता आहे असे वाटले नाही उलट मला लोक माझ्याकडे ज्या कुतूहलाने पाहतात हे मला मी स्पेशल असल्याची जाणीव करून देतं.
जगातील सर्वात कमी उंचीचा माणूस
हे ही वाचा<< मुलीच्या जन्माने हादरलं कुटुंब; पायगुण नव्हे तर ‘हे’ पाय बघूनच डॉक्टर झाले थक्क, पाहा Viral फोटो
प्राप्त माहितीनुसार, अफशीन शाळेत गेला नाही. अलीकडेच तो स्वत:चे नाव लिहायला शिकला आहे. आपण आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावे इतकेच अफशीनचे स्वप्न होते आणि आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याने त्याला आणखी प्रसिद्धी मिळून यातून त्याच्या स्वप्नपूर्तीला मदत होईल अशी अफशीनची इच्छा आहे. अफशीन आपल्या लहान उंचीमुळे व मोठ्या मनामुळे गावात प्रचंड फेमस होता आणि आता जगालाही त्याची ओळख झाली आहे.