Viral Video Shows Foreign Couple Crossing Road In India: रस्ता ओलांडणे म्हणजे आपल्यातील अनेकांना कठीण वाटते. यादरम्यान कोणी बरोबर असेल तर त्यांचा हात पकडून आपण रस्ता ओलांडतो. पण, जर एकटे असू तर घाबरत घाबरत, ज्या दिशेकडून गाड्या येत आहेत त्या दिशेने हात दाखवून, गाड्या थांबवून रस्ता ओलांडून मोकळे होतो. पण, काही अनुभवी व्यक्तीच असं सहज करून जातात. कारण प्रत्येकाला हे जमेलच असं नाही. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, यामध्ये काही परदेशी पर्यटक भारतात आले आहेत. यादरम्यान ते अगदी भारतीय पद्धतीत रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करताना दिसले आहेत, त्यामुळे त्यांचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओ पश्चिम बंगालचा आहे. एक परदेशी जोडपं भारतात आलं आहे, ज्यांचे नाव गुरु व लीला असे आहे. हे परदेशी जोडपं त्यांच्या व्हिडीओत आकर्षक ठिकाणे दाखवतात. आजच्या व्हिडीओमध्ये, परदेशी तरुणीने लीला बिंदी, झुमके आणि सलवार सूट परिधान केला आहे; तर तरुण कॅज्युअल सैल शर्ट व शॉर्ट्समध्ये दिसत आहे. दोघेही छान तयार होऊन रस्ता ओलांडण्यासाठी निघतात. मात्र, येणाऱ्या गाड्यांच्या वेगामुळे त्यांना झटपट रस्ता ओलांडता येत नाही. हे पाहून परदेशी तरुणी व्हिडीओत काय म्हणाली तुम्हीसुद्धा नक्की पाहा.
व्हिडीओ नक्की बघा…
भारतात किती वर्षे राहावे लागेल?
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, विदेशी जोडपं एकमेकांचा हात धरून रस्ता ओलांडताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये ते मध्यभागी उभे असतात आणि रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करताना दिसतात. पण, येणाऱ्या गाड्यांच्या वेगामुळे त्यांना झटपट रस्ता ओलांडता येत नाही. हे पाहून रस्ता ओलांडताना विदेशी महिला व्हिडीओमध्ये म्हणाली, ‘गाड्या थांबवण्यासाठीची सुपर पॉवर मिळवण्यासाठी आम्हाला भारतात किती वर्षे राहावे लागेल.” म्हणजेच हात दाखवून गाड्या थांबवणे हे काही परदेशी जोडप्याला जमलं नाही, म्हणून तिने असा प्रश्न युजर्सना विचारला आहे.
प्रश्न विचारताच युजर्सनीसुद्धा धम्माल प्रतिक्रिया कमेंटमध्ये दिल्या आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की, ‘तुम्हाला रस्ता ओलांडण्याची सुपर पॉवर मिळवण्यासाठी सुमारे १००० वर्षे लागतील’, तर दुसरा युजर म्हणाला, ‘एक दिवस पण पुरेसा आहे.’ आदी कमेंट, तर रस्ता ओलांडताना मोबाइल वापरू नका असा संदेशसुद्धा काही युजर्स कमेंटमध्ये देताना दिसले आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @guru_laila या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो सध्या अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.