video showed traffic on the Nashik highway : लाइटहाऊस जर्नलिझमला व्हॉट्सॲपसह सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर केलेला एक व्हिडीओ आढळला. व्हिडीओमध्ये रस्त्यावर प्रचंड गर्दी दिसून आली. मुंबईच्या मुलुंड चेक नाक्यापासून ते नाशिक महामार्गावर गाड्यांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या आहेत. हा व्हिडीओ एआयएमआयएम (AIMIM) च्या रॅलीचा असल्याचा दावा करण्यात आला होता. तपासादरम्यान आम्हाला हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे आढळले. तर हा व्हिडीओ (Video) नेमका कुठला, याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊ या…

काय होत आहे व्हायरल?

एक्स (ट्विटर) युजर रविचंद्रनने भ्रामक यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि “मुंबईकरांनो सावधान !! मुंबई-नाशिक महामार्गावरील आजची वाहतूक पाहा… ‘AIMIM रॅली, चलो मुंबई इम्तियाज जलील रॅली’…. रामगिरी आणि नितेश राणे यांच्या विरोधात महाराष्ट्रात प्रथमच मुस्लीम रॅली काढण्यात आली आहे आणि याचे पडसाद येत्या निवडणुकीत उमटतील”; अशी कॅप्शन देण्यात आली आहे.

इतर वापरकर्तेदेखील हाच व्हिडीओ (Video) शेअर करत आहेत.

हेही वाचा…‘सगळे लाड इथूनच…’ नातीला तयार करताना गाण्याबरोबर प्रेमाचेही सूर जुळले; पाहा VIRAL VIDEO

हा व्हिडीओ व्हॉट्सॲप ग्रुपवरही शेअर करण्यात आला आहे.

तपास :

आम्ही व्हिडीओ डाउनलोड करून आणि InVid टूलमध्ये अपलोड करून आमचा तपास सुरू केला. आम्ही व्हिडीओमधून मुख्य फ्रेम्स मिळवल्या आणि मिळालेल्या स्क्रीनशॉटवर उलट शोध सुरू केला. तेव्हा आम्हाला फेसबुक पेजवर अपलोड केलेला व्हिडीओ आढळला: Tín thác – lòng Chúa thương xót

https://www.facebook.com/watch/?v=503570839125541

त्यात कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, १० सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी टॅसी टोलू, तिमोर-लेस्टे येथे पोप फ्रान्सिस यांच्या स्वागताच्या वेळी सहा लाखांहून अधिक लोक उपस्थित होते. लोकांनी रांगेत उभं राहून पोप फ्रान्सिस यांना अभिवादन केलं.

आम्हाला यूट्यूब चॅनेलवर SAP News TL नावाचा व्हिडीओही सापडला.

हा व्हिडीओ चार दिवसांपूर्वी येथे अपलोड करण्यात आला होता. तसेच याचे व्हिज्युअल्स एआयएमआयएमच्या रॅलीच्या व्हिडीओसारखेच आहेत .

आम्हाला दुसऱ्या फेसबुक पेजवरदेखील एक व्हिडीओ सापडला.

https://www.facebook.com/watch/?v=820452263577367

आम्हाला vaticannews.com वर पोप फ्रान्सिस यांनी तिमोर लेस्तेला भेट दिल्याचा अहवाल सापडला.

https://www-vaticannews-va.translate.goog/vi/church/news/2024-09/chuyen-ben-le-vieng-tham-dtc-phanxico-dong-timor.html?_x_tr_sl=auto&_x_tr_tl=en&_x_tr_hl= en&_x_tr_pto=wapp

सप्टेंबर महिन्यात त्यांच्या भेटीबाबत अनेक बातम्या आल्या होत्या.

1. https://www.vaticannews.va/en/pope/news/2024-09/thousands-of-people-greet-pope-as-he-arrives-in-timor-leste.html#:~:text=Pope

2. https://www.ucanews.com/pope-visit-2024/asia-and-oceania/timor-leste

निष्कर्ष : पोप फ्रान्सिस यांनी तिमोर-लेस्टेला जेव्हा भेट दिली, त्या गर्दीचा व्हिडीओ मुंबईतील अलीकडील AIMIM च्या रॅलीचा आहे असे सांगून शेअर होत आहे. म्हणजेच व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.