Mount Everest Beautiful View : सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. यातील काही गोष्टी फार मजेशीर असतात, तर काही फार सुंदर असतात. अनेकदा आपल्यासमोर असा एखादा व्हिडीओ येतो, जो आपल्याला पुन्हा पुन्हा पहावासा वाटतो. असे व्हिडीओ आपल्या मनात फार कुतूहल निर्माण करतात. सध्या जगातील असाच एक अद्भुत व फार सुंदर व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून अनेकजण अवाक् झाले आहेत. हा व्हिडीओ जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या माऊंट एव्हरेस्टचा आहे. माऊंट एव्हरेस्टच्या शिखरावर उभं राहून काढलेला हा व्हिडीओ आता खूप व्हायरल होत आहे. शिखरावर उभे राहिल्यानंतर जमिनीकडचे दिसणारे सुंदर अविश्वसनीय सौंदर्य पाहून सारेच चकित झाले आहेत.
हे दृश्य पाहिल्यानंतर किती जणांनी एव्हरेस्ट चढायचा प्लॅन सुरू केला असेल कुणास ठाऊक. पण, तिथे पोहोचणे सगळ्यांनाच जमते असे नाही, खूप जण प्रयत्न करूनही या शिखरापर्यंत पोहोचू शकत नाहीत.
माऊंट एव्हरेस्टचे कधीही न पाहिलेले सुंदर दृश्य
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये, माऊंट एव्हरेस्टचा कॅमेऱ्यातून ३६० डिग्री अँगलने कॅप्चर करण्यात आला आहे. हे दृ्श्य बघून डोळ्यांवर विश्वास ठेवणं जरा कठीण जात आहे.
सरड्याप्रमाणे रंग बदलणारा मासा कधी पाहिला आहे का? व्हायरल video पाहून तुम्हीही व्हाल चकित
हा व्हिडीओ माउंटेनियर्सने शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्याने लिहिले- माऊंट एव्हरेस्टच्या शिखरावरून ३६० डिग्री कॅमेरा व्ह्यू. या व्हिडीओमध्ये गिर्यारोहक शिखरावर उभे असल्याचे दिसत आहे. यानंतर तिथून खाली बघितल्यास जमिनीवरील एक वेगळाच नजारा दिसून येतो.
हा व्हिडीओ पाहून लोक खूप कमेंट करत आहेत. एका युजरने लिहिले, पृथ्वी सपाट नाही. तर दुसऱ्याने लिहिले, आता आपण एव्हरेस्ट शिखरावर पोहोचलो आहोत, जिंकलो आहोत. परंतु, हा २०२२ सालचा असल्याचे सांगितले जात आहे, जो पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. माऊंट एव्हरेस्टचे सौंदर्य पाहून प्रत्येक जण थक्क होत आहे.