टायटॅनिक हे अतिशय विशाल असं जहाज होतं जे कधीच बुडणार नाही चर्चा होती. पण एका हिमनगासोबत झालेल्या धडकेत टायटॅनिक बुडाले. टायटॅनिक जहाजाला झालेला अपघात हा जगातील सर्वात विनाशकारी सागरी अपघातांपैकी हा एक मानला जातो. या अपघाताची रहस्ये आजही उलगडली नाहीत. यावर चित्रपट देखील आला होता. इतक्या वर्षानंतर आजही टायटॅनिकबाबतची क्रेझ मात्र संपण्याचं नाव घेत नाही. सध्या या बुडत्या टायटॅनिकसारखाच दिसणाऱ्या एका बाऊन्सी हाऊसचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून लोक टायटॅनिक जहाजाच्या वेगवेगळ्या गोष्टी शेअर करू लागले आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, बुडत्या टायटॅनिकची प्रतिकृती साकारलेला एक मोठा बाऊन्सी हाऊस दिसत आहे. तसंच खाली समुद्राची पाणी दाखवण्यासाठी निळ्या रंगाची मोठे फुगे जोडण्यात आले आहेत. तसंच हिमनगांचाही इफेक्ट या बाऊन्सी हाऊसला देण्यात आलाय. या व्हिडीओमध्ये अनेक लहान मुले बाऊन्सी हाऊसमधून खाली उड्या घेत घसरगुंडी खेळताना दिसत आहेत, तर त्यांचे पालक उभे राहून त्यांना खेळताना पाहत आहेत. ज्यावेळी टायटॅनिक जहाज समुद्रात बुडत होते त्यावेळी अशाच पद्धतीने लोक जहाजावर घसरत समुद्रात बुडू लागले होते. अगदी असंच चित्र या बाऊन्सी हाऊसने साकारलंय. हा व्हिडीओ पाहून लोकांना आश्चर्याचा धक्का तर बसलाच आहे. पण सोबत टायटॅनिकच्या आठवणी पुन्ही ताज्या झाल्या आहेत.

आणखी वाचा : हुबेहूब स्कॉच ब्राइटसारखा दिसणारा केक तुम्ही पाहिलाय का? मग हा VIRAL VIDEO एकदा पाहाच

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : उकडलेले अंडे सोलण्याची ही अनोखी आयडिया पाहून हैराण व्हाल! पाहा VIRAL VIDEO

हा व्हिडीओ नक्की कुठचा आहे, याबाबत अद्याप कोणती माहिती मिळालेली नाही. परंतू, misscox नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ शेअर होताच तो व्हायरल देखील झाला. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक तो पुढे सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करू लागले आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत १२ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत. तर पाच लाखांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. लोक या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया शेअर करताना दिसत आहेत.

Story img Loader