‘बुरा ना मानो होली है’ एकजण रंग लावायला येतं
‘ए नाही हा मला अजिबात रंग लावायचा नाही, माझ्या चेह-यावर पिंपल येतात.’
‘ ए त्याला ना एकदम चोपून रंग लाव, डोक्यात टीशर्टमध्येही ओत थोडा रंग”‘
” रंगपंचमीला मी कोणते कपडे घालून येऊ?”
” आज रंगपंचमी आहे का?”
”मी नाही येणार रंग खेळायला. मी वरूनच बघतो, तुम्ही खेळा रंग”
” ए थांब आपण सेल्फी काढू”
असे डायलॉग आजच्या दिवशी काही नवे नाही. आपल्या ग्रुपमध्ये असा एक ना एक नमुना असतोच ज्यांच्या तोंडी यापैकी काही वाक्ये कायम असतात आणि दरवर्षी रंगपंचमीला रंग खेळताना पाठ केल्यासारखी ही वाक्य या व्यक्ती बोलून दाखवतात. रंगपंचमी खेळण्याची वेळ आली की यांचे १०० नखरे सुरू होतात.
तरुणाईचे हे धम्माल किस्से फंक यु या युट्युब चॅनेलने दाखवले आहे. या चॅनेलने एक व्हिडिओ बनवला आहे. रंगपंचमीच्या दिवशी आपल्याला कसे कसे लोक भेटतात असा हा व्हिडिओ आहे. फार मजेशीर असा हा व्हिडिओ आहे तेव्हा तुम्हीही हा व्हिडिओ नक्की बघा. पाहा आपल्यासारखाच किंवा आपल्या ग्रुपमधले एखादं करेक्टर यात दिसतंय का!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा