सोशल मीडियावर सर्व प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात. मग तो मजेशीर व्हिडीओ असो किंवा इमोशनल व्हिडीओ किंवा असा कोणताही व्हिडीओ; जो पाहून लोक आश्चर्यचकित होतात. फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटरसारख्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्राणी वा पक्ष्याशी संबंधित व्हिडीओ व्हायरल होत असतात आणि हे व्हिडीओ लोकांना हसविणारे आणि लोकांच्या डोळ्यांत अश्रू आणणारेदेखील आहेत. आजकाल असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे; जो पाहून तुम्ही थक्क व्हाल.
अनेक वेळा प्राणी किंवा पक्ष्याची बुद्धिमत्ता आपल्याला इतकी आश्चर्यचकित करते की, तो चर्चेचा विषय ठरतो. या जगात कितीतरी मोठ्या प्रमाणात प्राणी आणि पक्षी राहत असतात. तुम्हाला अनेक प्राणी-पक्ष्यांबद्दल माहिती असली तरी अनेक प्राणी-पक्ष्यांबद्दल तुम्ही अनभिज्ञ असता. आतापर्यंत तुम्ही प्राण्यांना पक्ष्यांची शिकार करताना अनेकदा पाहिलं असेल. पण, तुम्ही कधी एखाद्या पक्ष्याला पक्ष्याचीच शिकार करताना पाहिलं आहे का? नाही तर मग हा व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील दंगच व्हाल. या व्हिडीओमध्ये तुम्ही एका पक्ष्याला दुसऱ्या पक्ष्याची शिकार करताना पाहू शकता. आश्चर्याची बाब म्हणजे हे दोन्ही पक्षी एकमेकांचा जीव घेण्यासाठी झटापट करताना दिसत आहेत.
पक्ष्यांमध्ये गरुड हा सर्वांत धोकादायक आणि शक्तिशाली शिकारी आहे. असं म्हणतात की, त्याच्या पंखांत एवढी शक्ती असते की, तो मोठा प्राणीही शिकार म्हणून सहज उचलून आकाशात उडू शकतो. गरुड त्याच्या मजबूत पंखांच्या जोरावर मोठ्या प्राण्याची सहज शिकार करू शकतो. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दोन गरुड आपल्या शिकारीसाठी लढताना दिसत आहेत.
(हे ही वाचा: VIDEO: इलेक्ट्रिक स्कूटरनी भरलेल्या ट्रकला भीषण आग; सर्व वाहने जळून खाक, घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल)
हा व्हिडीओ ‘मुकुल सोमण’ नावाच्या युजरने ‘इन्स्टाग्राम’वर शेअर केला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘मौत का हवाई चक्कर.’ व्हिडीओमध्ये दोन गरुड हवेत एकमेकांशी झुंजताना आणि लढताना कलाबाजी करताना दिसत आहेत. दोन्ही गरुडांनी एकच मासा आपल्या पंजांनी पकडून ठेवला आहे आणि तो दुसऱ्याकडून हिसकावण्यासाठी दोघेही सर्व शक्ती एकवटून वापरताना दिसतात. दोघेही दुसऱ्याच्या पकडीतून तो मासा संपूर्णत: स्वतकडे खेचून घेण्यासाठी हवेत अनेक वेळा डुबकी मारतात. पण शेवटी मासा त्यांच्या पकडीतून सुटतो आणि जमिनीवर पडतो.
येथे पाहा व्हिडिओ
गरुडांच्या या झटापटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि लाखो लोकांचे लक्ष त्याने वेधून घेतले. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर ६३ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. या क्लिपला ९१ हजारांहून अधिक वेळा लाइक करण्यात आले आहे.