Video Shows Biker Provided Lift To Pickpocket Man : रेल्वेस्थानक, ट्रेनमध्ये, बस, रिक्षा, रस्त्यावरून जाताना किंवा मॉल, मार्केट आदी गर्दीच्या ठिकाणी पाकीटमार संधीचा फायदा घेत चोरी करताना दिसतात. चोरांसाठी पाकीटचोरी हा पैसे मिळविण्याचा एक सोपा मार्ग आहे असे म्हणायला हरकत नाही. तुम्ही आजवर अनेक पाकीटमार चोरांचे व्हिडीओ पहिले असतील. पण, आज एका चोराने हद्दच पार केली आहे. एका दुचाकीस्वाराने अज्ञात व्यक्तीला लिफ्ट दिली. पण, हा प्रवासी नसून तो पाकीटमार चोर निघाला. नक्की काय घडलं ते लेखातून सविस्तर जाणून घेऊ.
व्हायरल व्हिडीओ चंदीगडमधील आहे. एका दुचाकीस्वाराने लिफ्ट मागणाऱ्या अज्ञात व्यक्तीला लिफ्ट दिली. काही अंतरापर्यंत प्रवास करत असताना चोराने आपलं नशीब अजमावण्याचा प्रयत्न केला. दुचाकीस्वाराच्या खिशात हात घालून त्याने पाकीट चोरण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी सुद्धा झाला. पण, दुचाकीस्वाराच्या ही गोष्ट लक्षात आली. दुचाकीस्वाराने दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबवली आणि अज्ञात व्यक्तीची विचारपूस करत त्याची झडती सुद्धा घेतली. दुचाकीस्वाराचे पाकीट मिळाले का व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…
व्हिडीओ नक्की बघा..
दुचाकीस्वाराचं चोरलं पाकीट :
व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिलं असेल की, पैसे चोरण्यासाठी या अज्ञात व्यक्तीनं दुचाकीस्वाराकडे लिफ्ट मागितली. त्या व्यक्तीचा अप्रामाणिक स्वभाव समजल्यावर दुचाकीस्वाराने बाईक रस्त्याच्या कडेला थांबवली. त्याने त्या माणसाची झडती घेतली तेव्हा त्याला त्याचे पाकीट पोटाशेजारी ठेवलेले आढळले. तेव्हाच धक्कादायकपणे लक्षात आले की तो खरा प्रवासी नसून पाकीट चोर आहे. हे पाहिल्यानंतर दुचाकीस्वाराने व्यक्तीसं मारहाण करण्यास सुरुवात केली.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ (Video) सगळ्यात आधी @Arhant Shelby या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला होता ; जो आता बऱ्याच युजर्सकडून रिपोस्ट केला जात आहे. ही घटना कॅमेऱ्यात रेकॉर्ड करण्यात आली आहे. दुचाकीस्वाराला कळले की त्याने नकळत एका पाकिटमाराला लिफ्ट दिली होती. लिफ्ट मिळूनही त्याने जे केले त्याबद्दल राग व्यक्त करत दुचाकीस्वाराने त्या व्यक्तीसं मारहाण करण्यास सुरुवात केली.