Video Shows Bull Carrying Sugarcane : शेतकऱ्यांच्या आयुष्यात प्राण्यांना विशेष महत्त्व आहे. त्यांच्या दैनंदिन जीवनात या प्राण्यांची खूप मदत होते. त्यांना गाय, बकरीपासून दूध मिळण्यास, तर शेतात व सामान वाहून नेण्यात बैलांची खूप मदत होते. त्यामुळे शेतीतील किंवा व्यावसायिक वापरातील प्राण्यांबद्दल शेतकऱ्यांच्या मनात नेहमीच आदर असतो. असे असले तरीही ऊस किंवा अवजड सामान वाहून नेताना या प्राण्यांचेही हाल होत असतील हे विसरूनही चालणार नाही. तर आज हेच दृश्य दाखवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

व्हायरल व्हिडीओ (Video) गावाकडचा आहे. ऊस वाहून नेत एक बैलगाडी चालली आहे. अचानक रस्त्यावरून जात असताना एक बैल ओझे घेऊन दमतो आणि रस्त्यातच बसकण मारतो. त्यामुळे गाडीचा भार पूर्णपणे दुसऱ्या बैलावर येतो. हे कळताच बैलगाडीचा मालक खाली उतरतो. बैलगाडी एका बाजूने त्या दमलेल्या बैलाच्या शरीरावर पडलेली दिसते आहे. हे पाहून रस्त्यावरील काही अनोळखी व्यक्ती त्या बैलाला मदत करण्यास धावून जातात. नक्की पुढे काय घडले ते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा नक्की बघा…

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा…“हे दिवस पुन्हा नाही…” ‘फेव्हिकॉल से’ गाण्यावर विद्यार्थ्यांचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून जुन्या आठवणीत जाल रमून

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिले असेल की, ऊस वाहून नेताना, ऊसकांड्यांचे वजन बैलगाडीच्या एका बैलाला झेपत नाही आणि रस्त्यामध्येच तो बसतो. त्यामुळे ऊसाने भरलेल्या बैलगाडीचा अर्धा भार दुसऱ्या बैलाच्या शरीरावर पडतो आणि त्या बैलगाडीचा पूर्ण भार दुसऱ्या बैलावर येतो. हे पाहून रस्त्यावरील काही अनोळखी व्यक्ती बैलाची मदत करण्यासाठी धावून येतात. त्याच्यावर पडलेला ऊसाचा भार उचलतात आणि दोन्ही बैलांना पाणी पिण्यास देतात. हे पाहून तुमच्याही डोळ्यांत नकळत पाणी येईल एवढे तर नक्की…

बोलता येत नाही म्हणून काय झाले?

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ (Video) @abhi_mane_29_3 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘बोलता येत नाही म्हणून काय झाले? त्यांनासुद्धा जीव आहेच की, त्यामुळे त्यांनाही प्रेम द्या’ असा संदेश व्हिडीओवर लिहिण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ‘बैल ऊस वाहून नेताना रस्त्यात बसतो आणि दोन बैलांना पाणी पाजत आहेत हे दोन्ही व्हिडीओ मर्ज केले आहेत. पण, जो मेसेज द्यायचा आहे तो महत्त्वाचा आहे’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरीसुद्धा हा व्हिडीओ पाहून, अरे, तुम्ही १० जण आलात ऊसाची गाडी उचलायला तरी तुम्हाला एक बाजू उचलण्यात वेळ गेला. मग त्या मुक्या जीवाला किती त्रास होत असेल याचा जरा विचार करा, बैलगाडीची ऊस वाहतूक लवकरच बंद झाली पाहिजे आदी वेगवेगळ्या कमेंट्स करताना दिसत आहेत.

Story img Loader