Video Shows Man Cleverness : एखादी कठीण परिस्थिती असो किंवा चांगली, करिअरसाठी एखादे क्षेत्र निवडायची किंवा नोकरीसाठी परदेशात जाण्याची वेळ आली की, काय करायचे किंवा काय नाही यासाठी योग्य निर्णय घेणे खूप महत्त्वाचे असते. कारण- जर त्यावेळी विचार करत बसून वाईट निर्णय घेतला, तर नुकसान होऊ शकते आणि वेळ न घालवता पटकन निर्णय घेतला की, चांगलेसुद्धा होऊ शकते. तर आज असाच एक व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. यामध्ये वेळीच निर्णय घेतल्यामुळे एका तरुणाचा जीव वाचला आहे.
आपल्यातील अनेक जण सिग्नल लागला नसेल तरी गाड्यांना हात दाखवून रस्ता ओलांडून मोकळे होतात. त्यामुळे आपल्यातील अनेकांना रस्ता ओलांडताना भीती वाटते. कारण – कोणती गाडी किती वेगात येईल याचा आपल्याला काहीच अंदाज नसतो. आजचा व्हायरल व्हिडीओ कुठला आहे याची अद्याप माहिती कळू शकलेली नाही. पण, एक तरुण रस्त्यावरून चालत येत होता. तितक्यात वेगात एक गाडी समोरून येते. ही गाडी त्याला उडवून जाणार, असे वाटते; पण तिथेच एक ट्विस्ट येतो. नक्की काय घडले ते व्हायरल व्हिडीओतून (Video) तुम्हीसुद्धा नक्की बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, तरुण रस्ता ओलांडून पदपथावर येत असतो. तेव्हा पदपथाच्या अगदी बाजूने एक चारचाकी गाडी येते. तरुण व ती गाडी येण्याची वेळ एक होते आणि अपघात होईल, असे वाटते. पण, तितक्यात तरुण झटकन निर्णय घेतो आणि उडी मारून थेट पदपथावर जातो. त्याच्या या पटकन घेतलेल्या निर्णयामुळे त्याचा जीव वाचतो आणि अपघात होत नाही. जे पाहून काही सेकंदांसाठी तुम्हालाही धडकी भरेल एवढे तर नक्की…
यमराजाबरोबर उठणं-बसणं आहे वाटतं
सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ (Video) @pro_capitalmotivation07 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘काम हे योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी झाले पाहिजे…’ ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरीसुद्धा हा व्हिडीओ पाहून, नशिबवान आहेस भावा, कब्बडीपटू, हा पोलीस भरती करणारा दिसतो, प्रो टॅलेंटेड, वेळेतच योग्य निर्णय घेतला भावाने, यमराजाबरोबर उठणं-बसणं आहे वाटतं भावाचं, भाई मौत को छू के टक से वापस आ गया आदी कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्याचे दिसत आहे.