Viral Video Shows Dad’s Super Power : आपण आपल्या बाबांना सुपरहीरो म्हणतो बरोबर ना… घरात एखादी वस्तू तुटली की, ती क्षणांत दुरुस्त करून देणे, कुठे बाहेर जायचे असल्यास नवीन कपडे इस्त्री करून देणे, आपली आवडती वस्तू न सांगता ऑफिसवरून येताना घेऊन येणे आदी अनेक गोष्टी एकटा आपला बाबा आपल्यासमोर नकळत करीत असतो. आपल्याला न जमणारी एखादी गोष्ट बाबांना जमली की, अगदी जग जिंकल्यासारखे वाटते. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये हातातून चिमुकले बाळ पडत असताना बाबांनी त्यांची जणू काही सुपर पॉवर वापरली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हिडीओनुसार (Video) बाबा आपल्याला चिमुकल्याला हातात घेऊन घराच्या घराच्या गेटजवळ उभा राहतो. बाईकवरून एक व्यक्ती येते आणि बाबांच्या हातात काहीतरी वस्तू देते. बाबा ती वस्तू घेतात आणि मग ती वस्तू व चिमुकल्याला बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतात. तितक्यात त्यांच्या हातातून बाळ सुटते, ते हवेत थोडेसे गोल फिरून खाली पडले असते. पण, तितक्यात बाबा त्याला अगदी सिनेमातील हीरोप्रमाणे फक्त एकाच हाताने पकडतात, जे पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल एवढे नक्की…


व्हिडीओ नक्की बघा…

जसं हातातून साबण सटकतो अगदी तसंच

व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिले असेल की, बाबा काही क्षणांसाठी अगदी घाबरून जातात. कारण- त्यांच्या एका हातात वस्तू आणि दुसऱ्या हातात बाळ असते. दोघांना सांभाळून तोल सांभाळायला जातात. ते अशा रीतीने ‘कसरत’ करीत असतानाच बाळ पटकन हातातून कसे निसटते हे त्यांच्याही कळत नाही. पण, वेळ न घालवता, ते चपळाईने जणू त्यांच्याकडे सुपर पॉवर असल्याप्रमाणे ते चिमुकल्याला खाली पडण्यापासून अगदी सहज वाचवतात आणि बाळाला जवळ करून, त्याची पाठ थोपटून त्याला पुन्हा घराच्या आतमध्ये घेऊन जातो.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @ghantaa या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘एका वडिलांनी चपळाई दाखवून आपल्या मुलाला पडण्यापासून वाचवले’, अशी कॅप्शन देण्यात आली आहे. तुमच्या वडिलांपेक्षा तुम्हाला जगात कोणीही तुम्हाला सुरक्षित वाटणार नाही, बाथरूममध्ये अंघोळ करताना जसा हातातून साबण सटकतो अगदी तसेच झाले, सूर्यकुमार यादव तर काही जणांना व्हिडीओ पाहून घाम फुटला, असे ते कमेंटमध्ये सांगताना दिसत आहेत.