Viral Video Shows dog was running after the ambulance that was carrying their owner : पाळीव प्राण्यांमध्ये सर्वात इमानदार कोण असेल तर तो श्वान प्राणी आहे. तुम्ही पाळीव श्वानांची घरातील सदस्याप्रमाणे काळजी घेतली तर तेदेखील तुमच्यासाठी काहीही करायला तयार असतात. अशा अनेक घटना याआधी सुद्धा समोर आल्या आहेत. तर आज सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे . यामध्ये एका इमानदार श्वानांने त्याच्या आजारी मालकाला रुग्णालयात नेणाऱ्या रुग्णवाहिकेचा पाठलाग केला आहे. नक्की काय घडलं ते बातमीतून सविस्तर जाणून घेऊ…

व्हायरल व्हिडीओत ( Video) एक रुग्णवाहिका रस्त्यावरून जाताना दिसते आहे. रुग्णवाहिकेच्या मागून एक श्वान देखील पळत जाताना दिसत आहे. तर प्रकरण असं आहे की, पाळीव श्वानाच्या मालकाची तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांना दवाखाण्यात घेऊन जात आहेत. आपल्या मालकाला रुग्णवाहिकेतून घेऊन जात आहे हे समजताच श्वान देखील घरातून बाहेर पडतो आणि रुग्णवाहिकेच्या मागे जोरात धावू लागतो. हे पाहून रुग्णवाहिकेत उपस्थित कर्मचाऱ्याने काय केलं व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

mother shouts at the Pet Dog
आई अशीच ओरडते ना? घरभर केस पडलेले पाहून श्वानाला ओरडली अन्… ; VIDEO पाहून येईल हसू
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Elephants go to the market dogs bark Elephant greets curious dog with angry stare charges towards it Hilarious viral video
“हाथी चले बाजार, कुत्ते भौंके हजार!”असे म्हणतात, पण इथे तर उलटंच घडलं, Viral Video पाहून पोट धरून हसाल
Viral Video Shows Pet Dog Wants To Ride
‘मम्मी प्लिज मला चढू दे…’ जत्रेत राईडमध्ये बसण्यासाठी श्वानाचा हट्ट, मालकिणीने केला ‘असा’ पूर्ण; पाहा Viral Video
Dogs Killed
Dogs Killed : अमानवी कृत्य… कुत्र्यांचे पाय आणि तोंड बांधून पुलावरून फेकून दिलं; २१ श्वानांचा मृत्यू, २१ गंभीर
Leopard Buldhana, Reunion of Mother Leopard ,
बुलढाणा : बिबट माता आणि हरवलेल्या पिल्लाची पुनर्भेट
Animal lovers demand stricter animal laws
प्राणीविषयक कायदे कडक करण्याची गरज, प्राणीप्रेमींची मागणी
terror of stray dogs vasai virar municipal corporation
शहरबात : भटक्या श्वानांची दहशत

हेही वाचा…‘कलेला वय नसतं’! ‘या’ चिमुकल्याचं संबळ वादन पाहिलंत का? VIDEO पाहून तुम्हीही धराल ठेका

व्हिडीओ नक्की बघा…

मालकाबरोबर जाण्यासाठी धडपड :

व्हायरल व्हिडीओत ( Video) तुम्ही पाहिलं असेल की, मालक रुग्णवाहिकेत आहे हे कळताच मागून पाळीव श्वान देखील पळत जाताना दिसत आहे. पाळीव प्राण्याचे मालकाप्रती प्रेम पाहून रुग्णवाहिकेत उपस्थित कर्मचारी यांनी रुग्णवाहिका थांबवली, उतरले आणि श्वानासाठी रुग्णवाहिकेचा दरवाजा खोलून दिला. दरवाजा उघडताच श्वान रुग्णवाहिकेत चढला आणि कर्मचाऱ्याने दरवाजा बंद करून पुन्हा रुग्णवाहिका चालवण्यास सुरुवात केली. या खास क्षणाने तुमचेही डोळे नक्कीच पाणावले असतील.

वैद्यकीय अधिका-याने आत घेपर्यंत श्वानाने रुग्णवाहिकेचा पाठलाग केला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ या @TaraBull808 एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘एक कुत्रा त्यांच्या मालकाला घेऊन जात असलेल्या रुग्णवाहिकेच्या मागे धावत होता. ईएमएसच्या लक्षात आल्यावर त्याला आत सोडण्यात आले’; अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. या व्हिडीओला ३ दशलक्षाहून अधिक व्ह्यूजसह व्हामिळाले आहेत आणि वापरकर्ते हा व्हिडीओ पाहून भावुक होताना दिसत आहे. .

Story img Loader