Viral video: सोशल मीडियावर नेहमी अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ मजेशीर असतात. तर काही व्हिडिओ बघून अंगावर काटा येतो. आता पंजाबच्या चंदीगडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे रस्त्यावरुन जात असलेली एका महिला आणि तिच्या मुलासोबत भयंकर अपघात घडला आहे. या भीषण घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ नुकताच समोर आलाय.
आयुष्य अतिशय क्षणभंगूर आहे. आता हसता-खेळता असणाऱ्या माणसाचं पुढल्या क्षणी काय होईल, याची कोणालाही कल्पना नसते. पण असा एक हादरा बसतो की, आपण सुन्न होतो. अशीच एक मन हेलावणारी, हृदयद्रावक घटना चंदीगड परिसरात घडली आहे. चंदीगडमधील मनीमाजरा भागात एक हृदयद्रावक अपघात समोर आला आहे. अचानक घराच्या छताचा काही भाग रस्त्यावरून जाणाऱ्या महिला आणि दोन मुलांवर कोसळला. तिघेही मोठ्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हा अपघात रस्त्यावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्याचा व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
(हे ही वाचा: शाळेत मुलानं वडिलांवर लिहिलेला निबंध वाचला, ऐकून शिक्षक कोमात, व्हायरल VIDEO पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही )
नेमकं काय घडलं?
चंदीगडमधील मनीमाजरा भागात एका जुन्या घराच्या पाडण्याचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली असल्याची माहिती आहे. घर पाडणाऱ्या ठेकेदाराने रस्त्यावर धोक्याचा इशारा फलक लावला नव्हता आणि त्या भागातून लोकांची ये-जाही थांबलेली नाही. अपघाताच्या समोर आलेल्या व्हिडिओमध्ये असे दिसते की, घर पाडताना एक महिला आणि सात वर्षे वयाची दोन मुले रस्त्यावरून जात होती. त्यानंतर अचानक घराच्या छताचा काही भाग कोसळून खाली गल्लीतील महिला व तिच्या दोन मुलांवर पडून ते ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या अपघातात ठेकेदाराचा पूर्ण निष्काळजीपणा समोर आला आहे.
महिलेची प्रकृती अधिक गंभीर
ढिगाऱ्याचा मोठा भाग महिलेच्या अंगावर पडला असून तिची प्रकृती अधिक गंभीर आहे. त्यांना चंदीगडच्या पीजीआयएमईआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन्ही मुलांनाही गंभीर दुखापत झाली. त्यांना रुग्णालयामध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखालीही ठेवण्यात आले आहे. अपघाताचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी जमीनमालक आणि कंत्राटदारावर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती आहे. तर पुढे या अपघाताचा अधिक तपास करण्यात येत आहे.