Video Shows baby elephant trying to play football : पावसाळ्यात फुटबॉल खेळण्याची मजा काही वेगळीच असते. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, धो-धो पाऊस पडायला सुरुवात झाल्यावर बिल्डिंगखाली वा मैदानात साचलेल्या पाण्यात अनेकांची पावलं फुटबॉल खेळण्याकडे वळतात. तर, आज असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण, यामध्ये माणसं नाही, तर चक्क प्राणी फुटबॉल खेळत आहेत. व्हायरल व्हिडीओत एक हत्तीचं पिल्लू आपल्या आईनं आपल्याबरोबर फुटबॉल खेळावा यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे.
व्हायरल व्हिडीओ ( Video) थायलंडमधील आहे. थायलंडमधील एलिफंट नेचर पार्कमध्ये हत्ती व तिचे पिल्लू दिसते आहे. हत्तीचे पिल्लू एक मोठा बॉल घेऊन, त्याला आपल्या सोंडेने ढकलताना (किक मारताना) दिसत आहे. त्याचबरोबर तेथे त्याची आईसुद्धा उपस्थित असते. पण, आई पिल्लाबरोबर फुटबॉल खेळण्यासाठी तयार नसते. मग मुद्दाम हत्तीचे पिल्लू आईकडे बॉल ढकलताना आणि तिच्यामागून फिरताना दिसत आहे. हत्तीच्या पिल्लाबरोबर आई फुटबॉल खेळली का हे व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
हत्तीच्या पिल्लाचा फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न :
व्हायरल व्हिडीओत ( Video) तुम्ही पाहिलं असेल की, एलिफंट नेचर पार्कमध्ये रिमझिम पाऊस सुरू आहे. आईला येताना पाहून हत्तीचे पिल्लू फुटबॉल तिच्या दिशेने घेऊन जाते. पण, आईला फुटबॉल खेळण्यात रस नसल्यामुळे हत्तीचे बाळ सतत बॉल त्याच्या आईकडे नेत असते. आई पुढे गेली की, मग तेही तिच्यामागून जाते. शेवटी कोणताच पर्याय समोर न राहिल्याने, हत्तीचे पिल्लू बॉल घेऊन पाण्याच्या डबक्यात जाते आणि एकटेच खेळण्यास सुरुवात करते. अशा प्रकारे या व्हिडीओचा शेवट होतो.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ ( Video) एलिफंट नेचर पार्कचे संस्थापक लेक चैलेर्ट यांच्या @lek_chailert या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच माई तिच्या आईला तिच्याबरोबर फुटबॉल खेळायला लावण्यासाठी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करताना दिसते आहे. ३० ऑगस्ट रोजी पोस्ट केल्यापासून या व्हिडीओला एक लाखाहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेक युजर्सनी या क्षणाचे विविध शब्दांत वर्णन केले आहे. एका युजरने, “हत्तीचं पिल्लू पावसात खेळत आहे. माणसांमध्ये जसं बालपण आहे, तसंच या हत्तींमध्येसुद्धा असतं हे पाहणं खूप गोड वाटतं”, अशी कमेंट केली आहे.