Video Of Boy During Aarti dancing and playing Taal for Bappa : गणपती बाप्पाच्या आगमनाने सगळीकडे उत्साहाचे वातावरण दिसते आहे. पण, उद्या लाडका गणराय आपला निरोप घेईल. गणेशोत्सवाच्या या अकरा दिवसांमध्ये सगळ्यांच्या घरात, सार्वजनिक मंडळात सकाळी, संध्याकाळी मोदकांचा प्रसाद, रोज दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची रेलचेल आणि आपल्या सगळ्यांची आवडती गोष्ट म्हणजे मनोभावे बाप्पाची दोन्ही वेळेस आरती होत असे. तर आज असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक चिमुकला आरतीमध्ये दंग झालेला दिसतो आहे.
व्हायरल व्हिडीओ ( Video) कोकणातील आहे. घरातील मंडळी बाप्पाची आरती करताना दिसत आहेत. या आरतीमध्ये मोठमोठ्याने ‘ओव्या गाऊ कौतुके तू’ हे भजन गायलं जात आहे. मात्र, कुटुंबातील सदस्यांपैकी एका चिमुकल्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. चिमुकल्याने गळ्यात मोठा टाळ घातला आहे आणि इतर म्हणत आहेत त्या भजनावर टाळ वाजवत ठेका धरताना दिसतो आहे. चिमुकला कशाप्रकारे भजनात दंग झाला आहे, व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
नाद आरतीचा…
आरती किंवा भजन सुरू होण्याआधी टाळ, ढोलक, घंटी, झांज कोण वाजवणार हे आधीच ठरलेले असते. हे पाहून घरातील चिमुकली मंडळीसुद्धा ते वाजवण्याची इच्छा व्यक्त करतात. व्हायरल व्हिडीओतील ( Video) हा चिमुकलासुद्धा टाळ घेऊन उभा आहे आणि ‘ओव्या गाऊ कौतुके तू’ भजनावर अगदी दंग झालेला दिसतो आहे. त्याने भजनावर धरलेला ताल, ठेका, त्याचे हावभाव अगदी बघण्यासारखे आहेत. तसेच कुटुंबातील इतर सदस्यसुद्धा चिमुकल्याचे हे रूप पाहून प्रसन्न झाले आहेत आणि त्याच्याकडे कौतुकाने बघत आहेत.
घरात उपस्थित एका अज्ञात व्यक्तीने चिमुकल्याचा हा व्हिडीओ शूट करून घेतला आहे आणि सोशल मीडियावर हा व्हिडीओ @kappu_kumbhar आणि @prasha_s7 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘नाद आरतीचा, अस्सल कोकणी’ अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. चिमुकल्याचे हे गोंडस रूप पाहून नेटकरीसुद्धा कमेंट करण्यापासून स्वतःला थांबवू शकले नाही आहेत. कमेंटमध्ये ते चिमुकल्याचे कौतुक करताना दिसून आले आहेत.