Video shows boy remove a nut and bolt from huge pole : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हिडीओद्वारे कधी कधी खोटी माहितीदेखील पसरवली जाते. हे व्हिडीओ खरे आहेत की खोटे हे जाणून न घेता, ते आपण सर्रासपणे इतरांना पाठवतो आणि सोशल मीडियावर शेअरदेखील करतो. तर, लाइटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात असलेला एक व्हिडीओ आढळला आहे. जिथे एक मुलगा रस्त्याकडेला असलेल्या मोठ्या खांबाचे नट आणि बोल्ट काढण्याचा प्रयत्न करताना दिसला आहे. तसेच हा व्हिडीओ भारतातील असल्याचा दावा केला जात होता. मात्र, तपासादरम्यान आम्हाला काहीतरी वेगळंच आढळून आलं आहे. नक्की काय आहे या व्हिडीओचं सत्य ते जाणून घेऊ…

नक्की काय होत आहे व्हायरल?

सुधीर मिश्रा यांनी त्यांच्या @Sudhir_mish या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून एक व्हिडीओ ( Video) शेअर केला आहे. या व्हिडीओत एक मुलगा मोठ्या खांबाचे नट आणि बोल्ट काढण्याचे प्रयत्न करताना दिसत आहे. ‘दहशतवादी विजेच्या खांबाचे नट कापतोय..? मग हा खांब पादचारी किंवा वाहनांवर पडून अनेकांचे प्राण जातील ना? मग ‘मोदी-योगी’च्या राजवटीत कोणीही सुरक्षित नाही, असा प्रचार केला जाईल?’, अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे…

Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
7 year old boy drew a picture of Dhananjay Powar on his hand
७ वर्षांच्या मुलाने धनंजय पोवारचं हातावर काढलं चित्र, आई डीपीला फोटो पाठवून म्हणाली, “दादा काय जादू केली…”
white giant squirrel spotted in mahabaleshwar
Video : महाबळेश्वरमध्ये पांढऱ्या शेकरूचे दर्शन !
Police found dead body of a boy in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
suniel shetty injured on hunter movie set
अभिनेता सुनील शेट्टीचा सेटवर झाला अपघात, स्वतःच अ‍ॅक्शन सीन शूट करताना झाला जखमी
young mans mobile was stolen
पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाचा मोबाईल हिसकाविला
diwali 2024
“तुम्ही गोड आहातच! पण….” भररस्त्यात पोस्टर घेऊन फिरतोय तरुण, Viral Video एकदा बघाच

इतर युजर्सदेखील असाच दावा करीत व्हिडीओ शेअर करीत आहेत.

हेही वाचा…रस्त्यावर ‘येई हो विठ्ठले’ची धून अन् फ्लॅटमधील महिलेचा डान्स; लोखंडवालातील व्हायरल VIDEO एकदा बघाच

तपास :

आम्ही व्हिडीओवर (Video) मिळवलेल्या कीफ्रेमच्या फोटोंचा शोध लावून तपास सुरू केला. याद्वारे आम्हाला अवन झांजेब या यूट्यूब चॅनेलवर एक वर्षापूर्वी अपलोड केलेला व्हिडीओ सापडला.

व्हिडीओचे शीर्षक होते की, ‘मंजूर कॉलनी अवामी चौक हिल टाउन मारवत पार्क येथील चोरांची मुले’

त्यानंतर अनेक प्लॅटफॉर्मवर आम्हाला हा व्हिडीओ ( Video) सापडला.

आम्हाला ‘नेशन ऑफ पाकिस्तान न्यूज’ या फेसबुक पेजवरसुद्धा हा व्हिडीओ सापडला.

https://www.facebook.com/watch/?v=826657595544342

व्हिडीओचे शीर्षक होते की, ही अशा चोरांची मुले आहेत, ते दिवसा रस्त्यावरील दिव्याच्या केबल्स कापतात आणि यांना कोणी असं का करीत आहेस, असं विचारणारसुद्धा नाही… मंजूर कॉलनी अवामी चौक हिल टाऊन मारवत पार्क…

२०२३ मध्ये फेसबुक युजर फरहान अलीनेही हा व्हिडीओ पोस्ट केला होता.

https://www.facebook.com/watch/?v=569881315091171

कराचीमध्ये मंजूर कॉलनी हा परिसर आहे. आम्ही गूगल मॅप्सवरदेखील स्थान शोधलं आणि आम्हाला ती जागादेखील सापडली.

निष्कर्ष : त्यामुळे तपासादरम्यान आम्हाला हे लक्षात आलं की, खांबावरून नट आणि बोल्ट काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलाचा व्हायरल व्हिडीओ भारताचा नसून पाकिस्तानचा आहे. त्यामुळे व्हायरल दावा हा दिशाभूल करणारा आहे हे सिद्ध झाले.