दररोज कित्येक लोकांनी रस्ते अपघातामध्ये मृत्यू होतात, तरीही अजूनही लोक वाहतूकीचे नियमांचे पालन करत नाही. काही तरुण तर नियमांचे उल्लंघन करत भररस्त्यात स्टंटबाजी करत स्वत:सह इतरांचा जीवही धोक्यात घालतात. सोशल मीडियावर अशा स्टंटबाजी करणाऱ्याचे व्हिडिओ अनेकदा व्हायरल होत असतात सध्या अशाच एका व्हिडीओची जोरदार चर्चा सुरु आहे. बंगळुरूमध्ये भररस्त्यात स्कूटरवर धोकादायक स्टंट करणाऱ्या अल्पवयीन मुलासह दोन तरुणांच्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. X वर शेअर केलेल्या व्हायरल व्हिडीओवर बेंगळुरू ट्रॅफिक पोलिसांकडूनही प्रतिसाद मिळाला आहे.

कर्नाटक पोर्टफोलिओ नावाच्या एका अकाऊंटने पोस्ट केलेल्या सहा सेकंदाच्या व्हिडिओमध्ये १८ नोव्हेंबर रोजी बनशंकरी दुसऱ्या स्टेजजवळ घडलेली घटना कॅप्चर करण्यात आली आहे. फुटेजमध्ये एक मुलगा स्कूटरवर स्टंट करताना दिसत आहे, तर पाठीमागे बसलेला अल्पवयीन मुलगा आधारासाठी त्याला चिकटून बसला आहे.

Bengaluru man kills son Over mobile
‘तू मेलास तरी फरक पडत नाही’, मोबाइलचं व्यसन जडलेल्या लहान मुलाचा वडिलांनीच केला निर्घृण खून
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Shocking accident a young man riding a scooter with his phone collided with a car video viral
VIDEO: असा भयंकर अपघात कधीच पाहिला नसेल! स्कूटर चालवता चालवता कारला आदळला अन्…, पुढे तरुणाबरोबर जे झालं ते पाहून उडेल थरकाप
Bike caught a fire alive man burnt in fire viral video on social media
VIDEO: एक चूक जीवावर बेतली! गाडीला आग लागताच लोक विझवायला गेले; पण पुढच्या क्षणी जे झालं ते पाहून उडेल थरकाप
speeding bike hit police, pune, bike hit police,
पुणे : नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांना भरधाव दुचाकीची धडक, दुचाकीवरील सहप्रवासी तरुणीसह चौघे जखमी
young mans mobile was stolen
पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाचा मोबाईल हिसकाविला
youth killed in bike accident in pune
बोपदेव घाटात दुचाकी घसरुन सहप्रवासी तरुणाचा मृत्यू
भररस्त्यात धावत होता घोडा, मागून येणाऱ्या स्कुटीला अचानक मारली लाथ अन्…. पाहा, Video Viral

हेही वाचा –लक्ष्य दिव्यांनी उजळले दगडूशेठ गणपती मंदिर! लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी पुणेकरांची गर्दी, पाहा सुंदर Video

व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “एक लहान मूल रस्त्यावर स्टंट करताना दिसले, जे केवळ स्वतःसाठीच नाही तर आसपासच्या इतरांच्या सुरक्षेसाठी देखील महत्त्वपूर्ण धोका निर्माण करते. ही घटना बनशंकरी दुसऱ्या स्टेज येथे मोनोटाइपजवळ, रात्री ८:२२ च्या सुमारास घडली. KA01 V 5613 या क्रमांकाने या वाहनाची नोंदणी करण्यात आली होती. सार्वजनिक रस्त्यावर असे बेपर्वा वर्तन अत्यंत धोकादायक आहे आणि त्यामुळे अपघात होऊ शकतात. मुलांना अशा असुरक्षित क्रियाकलापांमध्ये, विशेषत: सार्वजनिक रस्त्यावर गुंतण्याची परवानगी नाही याची खात्री करणे पालक आणि पालकांसाठी महत्वाचे आहे.”

हेही वाचा –“माझा वर्क-लाइफ बॅलन्सवर विश्वास नाही”; आठवड्यातील ७० तास काम करण्याच्या मतावर नारायण मूर्ती अजूनही ठाम

येथे व्हिडिओ पहा:

u

u

हेही वाचा –जीव इतका स्वस्त असतो का? बापानं चिमुकल्याला घेऊन उचललं टोकाचं पाऊल, इमारतीच्या टोकावर उभा राहिला अन्…, पाहा धक्कादायक VIDEO

बंगळुरू वाहतूक पोलिसांनी व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आणि कमेंट विभागात बनशंकरी वाहतूक पोलिस स्टेशनला टॅग केले.

अशा बेपर्वा स्टंटबाजीमुळे जीव धोक्यात येतो आणि वाहतूक कायद्याच्या कठोर अंमलबजावणीची गरज अधोरेखित होते. सार्वजनिक रस्त्यावर अशा घटना रोखण्यासाठी पालक आणि अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे काम करणे महत्त्वाचे आहे.