Video Shows Bride And Groom Dance Recreate By Young Girls : लग्न, वाढदिवस किंवा एखादा खास दिवस असेल तर सध्या अनेक जण सरप्राईज डान्स पर्फोमन्स करतात. या खास डान्स पर्फोमन्सचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात आणि नेटकरी या व्हिडीओवर फिदा होतात. तर बऱ्याच दिवसांपासून एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, यामध्ये एका नवीन लग्न झालेल्या जोडप्याने मामे खानचे लोकप्रिय गाणे ‘चौधरी’ या गाण्यावर (Mame Khan’s popular song Chaudhary) खूप सुंदर डान्स केला होता. तर हाच डान्स दोन तरुणींनी रिक्रिएट केला आहे.

तर बऱ्याच दिवसांपासून व्हायरल होणारा व्हिडीओ नवविवाहित जोडप्या मीत आणि जिनल (Meet and Jinal) चा आहे. या व्हिडीओत जिनल सुंदरपणे लग्नाच्या ठिकाणी पोहोचते आणि हिरव्या रंगाच्या वेशभूषेत चौधरी गाण्यावर डान्स करत एंट्री करते. तिचा नवरा तिच्याकडे कौतुकाने पाहत, तिचा उत्साह वाढवण्यासाठी डान्समध्ये सामील होतो आणि नाचताना तिची नजर काढतो आहे अशी स्टेप सुद्धा करतो. त्यानंतर हे जोडपे चेहऱ्यावर निखळ आनंद ठेवून अगदी उत्साहात नाचताना दिसते. तर हा व्हिडीओ पाहून दोन तरुणींनी अगदी हुबेहूब स्टेप करत सीन रिक्रिएट केला आहे, जो तुम्ही सुद्धा व्हिडीओतून बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

तर व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, दोन्ही तरुणींपैकी एक मीत (नवरा) आणि जिनल (नवरी) बनली आहे. दोघींपैकी एका तरुणींनी डोक्यावर नवरा मुलगा मीत सारखा फेटा लावला आहे. सुरवातीला जिनलचा रोल करणारी तरुणी डान्स करण्यास सुरुवात करते आणि मीत बनलेली तरुणी अगदी प्रेमाने बघत असते. जिनल बनलेल्या तरुणीचा उत्साह पाहून मीत बनलेली तरुणी नाचायला जाते आणि दोघेही व्हिडीओप्रमाणे अगदी गोल-गोल करत फिरत हुबेहूब स्टेप्स करताना दिसत आहेत.

खूप चांगला अभिनय

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @bihari.stree या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी तरुणींचे कौतुक करताना दिसत आहेत. ‘खूप चांगला अभिनय केला आहे, तुम्ही व्हिडीओ खूपच मस्त रिक्रिएट केला आहे, तुम्हाला पैकीच्या पैकी गुण’ आदी कौतुकास्पद कमेंट तर अनेक जण त्यांच्या मैत्रिणींना चल आपण पण हा व्हिडीओ रिक्रिएट करूया असे टॅग करून म्हणताना दिसत आहेत आणि या रिक्रिएट केलेल्या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

Story img Loader