Video Shows son plan birthday surprise for mother : लहानपणी आपले वाढदिवस आई-बाबा थाटामाटात साजरे करायचे, दिवाळीसाठी नवीन कपडे खरेदी करून आणायचे. पण, आता आपण नोकरीला लागल्यापासून नकळत आपण त्यांचे वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, दिवाळीत एखादा सण यानिमित्त त्यांना नवीन कपडे घेऊन देतो आहोत याची जाणीव कुठेतरी आता आई-बाबांनाही होऊ लागली आहे. तर आज सोशल मीडियावर याचसंबंधित एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्यामध्ये लाडक्या लेकाने आईला सरप्राईज दिले, ते पाहून बाबांनी सुंदर कॅप्शन दिली आहे, जी पाहून तुमचे डोळे नक्कीच पाणावतील.

व्हायरल व्हिडीओत (Video) आईचा वाढदिवस असतो. लेक आईसाठी केक घेऊन येतो, मिठी मारतो आणि तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. त्यानंतर बाबा घड्याळासमोर उभे राहतात आणि बरोबर १२ वाजले की, आईसाठी आणलेला केक कापण्यास सुरुवात करतात. त्यानंतर कुटुंबातील सदस्य एकमेकांना केक भरवण्यास सुरुवात करतात आणि अशा आनंदात वाढदिवस आईचा साजरा केला जातो. मुलानं दिलेलं खास सरप्राईज पाहून बाबांनी काय कॅप्शन लिहिली आहे ते व्हायरल व्हिडीओतून एकदा तुम्हीसुद्धा बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिलं असेल की, मुलानं आईच्या वाढदिवसासाठी केक आणला आणि बाबा त्यांच्या बायकोच्या वाढदिवसाचे खास क्षण मोबाईलमध्ये रेकॉर्ड करताना दिसत आहेत. मुलानं आईसाठी रात्री १२ वाजता केक आणल्यानंतर बाबा भावूक झाले आहेत आणि त्यांनी, ‘आपला मुलगा असं सरप्राईज द्यायला लागला की, समजावं आता आपली रिटायर होण्याची वेळ जवळ येतेय’, अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे, तो सेलिब्रेशनचा व्हिडीओ आणि ती कॅप्शन वाचून तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल एवढे तर नक्की.

त्यानंतर संपूर्ण सेलिब्रेशनचा व्हिडीओ (Video) बाबांनी @dineshyelkar38_shreefoods या इन्स्टाग्रामवर अकाउंटवरून शेअर केला आहे आणि ‘मी दररोज एकाच व्यक्तीच्या प्रेमात पडतो आणि ती व्यक्ती म्हणजे माझी बायको. माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा’, अशीही कॅप्शन व्हिडीओला दिली आहे.

Story img Loader