Video Shows Father And Daughter Love : बाबा व लेक यांचे नाते जगावेगळे असते असे म्हणतात. मुलीला पहिल्यांदा हातात घेतल्यापासून ते अगदी तिची पाठवणी करण्यापर्यंतचा हा प्रवास खूपच अनोखा असतो. तिचे पालनपोषण, तिचे शिक्षण, तिची नोकरी, तिचे लग्न आदी सगळ्याची जबाबदारी बाबांवर असते. त्यामुळे हात पकडून चालणाऱ्या चिमुकलीला एकेदिवशी त्यांचा हात कायमचा सोडून सासरी जावे लागते. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये बाबा आणि लेकीच्या आयुष्यातले दोन टप्पे एकाचवेळी चित्रित करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडीओ (Video) लग्नसमारंभातील आहे. एका जोडप्याचे लग्न लागलेले असते. लग्नादरम्यान स्टेजवर बाबा आणि लेक आणि स्टेजच्याखाली दुसऱ्या बाबा-लेकाची जोडी उभी आहे असे दिसते आहे. एकीकडे स्टेजवर आपल्या बाबांना घट्ट मिठी मारून लेक रडताना दिसते आहे, तर दुसरीकडे बाबांच्या खांद्यावर बालपणीचा आनंद घेताना चिमुकली दिसते आहे. लग्नसमारंभात उपस्थित एका अज्ञात तरुणीने हा क्षण पाहिला आणि त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड करून घेतला. बाबा आणि लेकीच्या आयुष्यातील दोन महत्त्वाचे टप्पे व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

घरी आल्यावर लेकीने बाबांना मारलेली मिठी आणि सासरी जाताना तिने मारलेली मिठी यामध्ये प्रचंड भावना दडलेल्या असतात. तिने मारलेली मिठी हा तिचा त्यांच्यावरील मायेचा आविष्कार असतो, तर बाप-लेकीच्या नात्याशी संबंधित व्हायरल झालेल्या या व्हिडीओला हे उत्तर आहे असे म्हणायला हरकत नाही. व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिले असेल की, कुठेतरी चिमुकलीला उचलून घेऊन उभ्या असलेल्या बाबालासुद्धा हा दिवस बघावा लागेल, हे त्याच्या डोळ्यात आणि दुसऱ्या बाबाने जावयाला मिठी मारून माझ्या लेकीचा सांभाळ कर असे म्हणणारे हे दृश्य आहे.

लाडकी लेक

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @samadritaa._ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘लाडकी’ असे कॅप्शन तिने या व्हिडीओला दिले आहे. नेटकरीसुद्धा हा व्हिडीओ पाहून विविध भावना कमेंटमध्ये व्यक्त करताना दिसत आहेत. कोणाला हे दृश्य पाहून त्यांच्या बाबांची आठवण आली आहे, तर कोणाचे बाबा देवाघरी गेल्यामुळे त्यांना हा क्षण अनुभवता आला नाही असे काही नेटकरी कमेंटमध्ये सांगताना दिसून आले आहेत. एकूणच सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video shows daughter and father two different stages of life in one frame asp