Video Shows Served 379 Dishes To Son In Law : लग्नाआधी केळवणासाठी किंवा लग्नानंतर पहिल्यांदा जेव्हा जोडपं घरी येतं तेव्हा तो क्षण घरच्यांसाठी खास असतो. म्हणून आपण त्यांच्यासाठी खास मेजवानीचं आयोजन करतो हे तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. पण, व्हायरल व्हिडीओत एका कुटुंबानं त्यांच्या जावयासाठी एक भव्य मेजवानी आयोजित केली आहे. पण, या मेजवानीचा मेन्यू इतका लांबलचक होता की, तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. जावयाच्या स्वागतासाठी कोणत्या कोणत्या पदार्थांची मेजवानी ठेवण्यात आली होती चला पाहूयात…

व्हायरल व्हिडीओ (Viral Video) आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील नरसापुरमचा आहे. लग्नानंतर पहिल्यांदा मुलगी व जावई घरी आले आहेत. त्या प्रसंगी कुटुंबानं जावयाच्या स्वागतासाठी ३७९ पदार्थ बनवले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे सर्व पदार्थ घरी तयार करण्यात आले आहेत. तुम्ही पाहू शकता की, एका मोठ्या टेबलावर हे सगळे पदार्थ अगदीच खास रीतीनं मांडून ते नवविवाहित जोडप्यासमोर ठेवले आहेत. जावयासाठी सासूनं कोणते पदार्थ बनवले आहेत ते चला पाहूयात…

Paaru
Video: “आदित्यसरांचं नाव घेते माझ्या…”, पारूने आदित्यसाठी घेतला उखाणा; सावली, लीला व तुळजाने केले कौतुक
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Amruta Khanvilkar New Home Griha Pravesh
Video : “स्वकष्टाने उभारलेलं…”, अमृता खानविलकरचा कुटुंबीयांसह नव्या घरात गृहप्रवेश! २२ व्या मजल्यावर आहे आलिशान फ्लॅट
funny ukhana
“पुढच्या जन्मी मुकेश अंबानीच हवा”; काकूंचा उखाणा ऐकून काकांनी दोन्ही हात वर केले, पाहा मजेशीर Video
Marathi actress Aishwarya Narkar Dance With Ashwini Kasar on Ranbir Kapoor song
Video: ऐश्वर्या नारकर यांनी अश्विनी कासारबरोबर केला सुंदर डान्स, पाहा व्हिडीओ
Savlyachi Janu Savli
Video: ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील कलाकारांचा ‘कोंबडी पळाली’ गाण्यावर भन्नाट डान्स; नेटकरी म्हणाले, “तुम्ही किती…”
Groom dance with mother in his haldi on khandeshi song video goes viral on social media
“आये कर मन लगन” नवरदेवानं बायकोसोबत नाहीतर आईसोबत धरला खानदेशी ठेका; VIDEO झाला व्हायरल
Groom bride dance video in there wedding on marathi song video goes viral
VIDEO: “आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमचं” नवरीनं लग्नात केला भन्नाट डान्स; पाहून नवरदेवही झाला लाजून लाल

हेही वाचा…मालक नाही मित्र…! श्वान पावसात भिजू नये म्हणून आजोबांचा जुगाड; प्लास्टिकच्या पिशवीनं झाकलं, टोपी घातली अन्… पाहा VIDEO

व्हिडीओ नक्की बघा…

जावयाच्या स्वागतासाठी ३७९ पदार्थ :

व्हायरल व्हिडीओत ( Viral Video) तुम्ही पाहिलं असेल की, लेक आणि जावई एका मोठ्या टेबलापुढे बसले आहेत. हे टेबल जेवणाच्या पदार्थांपासून ते गोड पदार्थांपर्यंत अनेक पदार्थांनी सजवून ठेवलं आहे. टेबलावर ठेवलेल्या एकूण ३७९ पदार्थांमध्ये ४० फ्लेवर्सचे भात, २० पोळ्या, चटण्या, ४० करी, ९० ते १०० मिठाई, ७० ज्यूस वा पेये आणि ४० अन्य पदार्थांचा समावेश आहे. तसेच जावयाला दोन अज्ञात पुरुषांनी उचलून घेतलं आणि टेबलाजवळील खुर्चीवर आणून बसवलं आहे. हे क्षण तुमच्याही चेहऱ्यावर आनंद देणारे आहेत.

व्हायरल पोस्टनुसार या जोडप्यानं गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लग्न केलं होतं. कुटुंबानं त्यांची पहिली ‘मकर संक्रांत’ साजरी करण्यासाठी नवविवाहित जोडप्याला दुपारच्या जेवणासाठी घरी बोलावून त्यांचं हटके स्वागत केलं आणि ३७९ मेजवानी पदार्थांची सजावट केली. हा व्हिडीओ जावई ब्लॉगर कुशधर याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे; जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तसेच ‘आपल्या आजूबाजूला अशी माणसं आहेत यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो, अशी कॅप्शन जावयानं या पोस्टला दिली आहे.

Story img Loader